अवधुत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकरचे अमेरिकेमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट 

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 27 April 2019

सुरेल क्रिएशन आणि 3एएमबीझ यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेमध्ये "अवधुत गुप्ते-स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉन्सर्ट'चे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम खास मेजवानी ठरणार आहे. अवधूत आणि स्वप्निल बरोबरच गायिका जुईली जोगळेकर ही देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

मुंबई - गायक अवधुत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर अमेरिकेमधील मराठी रसिकांसाठी सुरेल गाण्यांची मैफील घेऊन आले आहेत. सुरेल क्रिएशन आणि 3एएमबीझ यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेमध्ये "अवधुत गुप्ते-स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉन्सर्ट'चे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम खास मेजवानी ठरणार आहे. अवधूत आणि स्वप्निल बरोबरच गायिका जुईली जोगळेकर ही देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. तसेच उत्तम लाइव्ह म्युझिशिअन्स यांची साथ या कॉन्सर्टला लाभणार आहे. 

पोर्टलॅण्ड, डॅलस, सेंटलुईस, सॅक्रामेंटो, वॉशिंग्टन डीसी, फिलाडेल्फिया, न्यु जर्सी, बोस्टन, सॅन होजे, क्‍लीव्हलॅण्ड, नॅशवील, अटलांटा अशा अमेरिकेतील 12 शहरांत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन मानसी इंगळे करणार आहेत. 26 एप्रिल ते 19 मेपर्यंत आठवड्यातील शुक्रवार ते रविवार सलग चार आठवडे हा कार्यक्रम येथील वेगवेगळ्या शहरात रंगणार आहे. "स्वरसुधा' या अमेरिकेतील कंपनीने या कार्यक्रमासाठी सहकार्य केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Live concert in Avadhoot Gupte and Swapnil Bandodkar in America