'दादा'ला 'गुड न्यूज' सांगणारं नाटक धडाक्यात येतंय! (व्हिडिओ)

शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

'दादा, एक गुड न्यूज आहे.' या नाटकाचा अभिनेता उमेश कामत व सहनिर्माती प्रिया बापट यांनी 'सकाळ' फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांशी गप्पा मारल्या. त्यांचे अनुभव सकाळसोबत शेअर केले. सविस्तर गप्पा बघा व्हिडिओमध्ये...

पुणे : मराठी नाटके नेहमीच दर्जेदार विषय हाताळत असतात. मराठी रसिक प्रेक्षक या सर्व नाटकांवर भरभरून प्रेम करतात. अशाच एका नाटकाची सर्व माध्यमांमध्ये सध्या चर्चा आहे, ते नाटक म्हणजे 'दादा, एक गुड न्यूज आहे.' या नाटकाच्या शुभारंभापूर्वीच हे नाटक चर्चेत होतं, ते त्याच्या जाहिरातीमुळे! मुंबई-पुण्यात 'दादा, मी प्रेग्नंट आहे' अशा आशयाचे होर्डींग्स लागले होते. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. अखेर या रहस्याचा उलगडा झाला व ती नाटकाची जाहिरात असल्याचे समोर आले.

'दादा, एक गुड न्यूज आहे.' या नाटकाचा अभिनेता उमेश कामत व सहनिर्माती प्रिया बापट यांनी 'सकाळ' फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांशी गप्पा मारल्या. त्यांचे अनुभव सकाळसोबत शेअर केले. सविस्तर गप्पा बघा व्हिडिओमध्ये...

या नाटकात उमेश कामत व ऋता दुर्गुळे यांच्या मुख्य भूमिका आहेत, तर लेखन कल्याणी पाठारे व दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले आहे. निर्मिती सोनल प्रॉडक्शन व प्रिया बापट यांनी केली आहे. पुण्यातील शुभारंभाचा प्रयोग हा रविवार 30 डिसेंबर सायं. 5.00 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे.    

Dada ek good news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Live Interview of Play Dada ek Good News Ahe