Oscars 2023 Live: अँड द ऑस्कर गोज टू.. RRR चित्रपटातील Natu Natu गाण्याला ऑस्कर, टाळ्या आणि शिट्ट्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

oscars 95, oscar awards 2023, natu natu, deepika padukon, RRR

Oscars 2023 Live: अँड द ऑस्कर गोज टू.. RRR चित्रपटातील Natu Natu गाण्याला ऑस्कर, टाळ्या आणि शिट्ट्या

या सिनेमाने पटकावला बेस्ट सिनेमाचा ऑस्कर पुरस्कार

ऑस्कर २०२३ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात Everything Everywhere All at Once हा सिनेमा बेस्ट पिक्चर ठरला आहे. सिनेमाच्या सर्व टीमने आनंद साजरा केला

हि अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

ऑस्कर २०२३ पुरस्कार सुरु आहेत. यात बेस्ट अभिनेत्री कॅटेगरीत Michelle Yeoh या अभिनेत्रीला Everything Everywhere All at Once सिनेमासाठी बेस्ट अभिनेत्री म्हणून ऑस्कर मिळाला आहे

हा अभिनेता ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

ऑस्कर २०२३ पुरस्कार सुरु आहेत. यात बेस्ट अभिनेता कॅटेगरीत Brendan Fraser या अभिनेत्याला त्याच्या The Whale सिनेमासाठी Best Actor म्हणून गौरवण्यात आले

RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे

तमाम भारतीय प्रेक्षकांच्या, चाहत्यांसाठी अभिमानाची गोष्ट आत घडली आहे. ज्या क्षणाकडे भारतीय डोळे लावून बसले होते तो सुवर्णक्षण याची देही याची डोळा लाखो जणांनी अनुभवला आहे. एस एस एस राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे भारतीय चित्रपट विश्वामध्ये आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे.

अवतार 2 ने पटकावला हा मोठा बहुमान

काहीच दिवसांपुर्वी भारतात रिलीज झालेल्या अवतार 2 सिनेमाने Best Visual effects पुरस्कार पटकावला आहे. अवतार 2 भारतात सुपरहिट झाला. अनेकांनी सिनेमातल्या VFX चं कौतुक केलं. आता अवतार 2 ने बेस्ट Visual effects चा ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.

भारतीय शॉर्ट फिल्मने पटकावला ऑस्कर

The Elephant Whisperers या ४१ मिनिटाच्या शॉर्ट फिल्मने बेस्ट शॉर्ट फिल्म पुरस्कार पटकावला. भारतीयांच्या शिरपेचात यामुळे मानाचा तुरा रोवला गेलाय.

दीपिका आली आणि भाव खाऊन गेली

अभिनेत्री दीपिका पदुकोणने ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर प्रेझेन्टर म्हणून जबाबदारी निभावली. दीपिका येताच सर्वांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट केला. दीपिकाने भारताच्या RRR बद्दल सगळ्यांना माहिती सांगितली. दीपिकाने तिच्या खास अंदाजात अत्यंत सुंदरपणे तिची जबाबदारी पार पाडली. दीपिका काळ्या गाऊनमध्ये अत्यंत मनमोहक दिसत होती

ऑस्करच्या मंचावर चक्क एका गाढवाची एंट्री

ऑस्कर पुरस्कार सोहळा शानदार पद्धतीने सुरु आहे. पण ऑस्कर पुरस्कार सोहळयात एक अजब गोष्ट घडली आहे. ऑस्करच्या मंचावर चक्क एका गाढवाने एंट्री केलीय. या गाढवाला लाल रंगाचा बो बांधला होता. गाढवाच्या एन्ट्रीमुळे सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली.

हि ठरली बेस्ट डॉक्युमेंट्री फिल्म

Navalny ने सर्वोत्कृष्ट माहितीपट फीचर फिल्म ऑस्कर जिंकलाय. या कॅटेगरीत - ऑल दॅट ब्रीद्स, ऑल द ब्युटी अँड द ब्लडशेड, फायर ऑफ लव्ह, अ हाऊस मेड ऑफ स्प्लिंटर्स. ऑल दॅट ब्रीदस हा भारतीय सिनेमा सुद्धा सहभागी होता. पण Navalny ने बेस्ट डॉक्युमेंट्री फिल्म पुरस्कार पटकावला आहे.

ऑस्करमध्ये RRR टीमचा जलवा

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. SS राजामौलीच्या RRR सिनेमातील natu natu गाणं ऑस्करसाठी नॉमिनेटेड आहे. त्यानिमीत्ताने राजामौली, Jr NTR , Ram Charan ऑस्कर सुरु होण्याआधी रेड कार्पेटवर दिमाखात एंट्री घेत अवतरले. या तिघांच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हा ठरला बेस्ट ऍनिमेशन सिनेमा

मेक्सिकन चित्रपट निर्माता गिलेर्मो डेल टोरो यांच्या "पिनोशीयो" ने सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्मचा अकादमी पुरस्कार जिंकला, जो त्याच्या कारकिर्दीतील तिसरा ऑस्कर ठरला.

Oscars 2023 Live: दीपिका पदुकोणच्या ग्लॅमरस लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

ऑस्कर २०२३ सोहळ्यात दीपिका पदुकोण सहभागी झाली आहे. व्हाइट कार्पेटवर दीपिकाच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दीपिका या सोहळ्यात मोठ्या कलाकारांसोबत प्रेझेंटर म्हणून जबाबदारी निभावणार आहे.

Oscar 2023 Live Updates: आज ऑस्कर 2023 पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. जगभरातल्या नामांकित कलाकृती ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नॉमिनेशन लिस्ट मध्ये आहेत. या सर्व कलाकृतींमध्ये भारतीय सिनेमा RRR सुद्धा समाविष्ट आहे. RRR ला मधील नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरी मध्ये नॉमिनेशन मिळालंय. RRR ऑस्कर सोहळ्यात बाजी मारून भारतीयांची मान उंचावणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

टॅग्स :Oscar AwardoscarOscars