"टॉय स्टोरी'साठी दीर्घ प्रतीक्षा

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

तब्बल 180 अब्ज डॉलर्स कमावलेल्या "टॉय स्टोरी' चित्रपटाचा चौथा भाग अधिक कल्पक असेल, असे ऑस्कर विजेता हॉलिवूड अभिनेता टॉम हॅंक्‍स याने म्हटले आहे. मात्र या भागासाठी त्यांच्या टीमला पुरेसा वेळ दिला पाहिजे, असेही हॅंक्‍सने सांगितले.

या चित्रपटाच्या आधीच्या तिन्ही भागांतील प्रमुख व्यक्तिरेखा असलेल्या "वुडी'ला हॅंक्‍सचा आवाज आहे. नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त हॅंक्‍स लंडनमध्ये आला होता. त्या वेळी "टॉय स्टोरी'बद्दल बोलताना तो म्हणाला.

"मला माझ्या व्यक्तिरेखेबद्दल कमालीची उत्सुकता आहे. "वुडी'चा प्रवास नेमका कसा होणार आहे, हे मलाही जाणून घ्यायचेय.'' "टाय स्टोरी'चा चौथा भाग 2017 मध्ये प्रदर्शित होईल, असे डिस्ने-पिक्‍सार या निर्माता संस्थेने यापूर्वी घोषित केले होते. त्यानंतर 2018 पर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. सध्याच्या माहितीनुसार, चित्रपट जून 2019 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: log wait for toy story