'मर्दानी 2'वर लोकसभा अध्यक्ष बिर्ला म्हणाले...

वृत्तसंस्था
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

या चित्रपटात थेट कोटा या शहरालाचा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या या शहाराबाबत असे दाखविणे योग्य नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बिर्ला हे कोटाचे रहिवासी आहेत, तसेच ते कोटाचे खासदारही आहेत. 

राणी मुखर्जीचा 'मर्दानी 2' जबरदस्त ट्रेलरमुळे चर्चेत असतानाच आता तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 'मर्दानी 2'बाबत थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाष्य केले आहे. त्यामुळे हा विषय साधासुधा नसून सरकारमधील मोठ्या नेत्याने यावर प्रश्न उपस्थित केला असल्याने त्याला गंभीर स्वरूप येऊ शकते.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

कोटा या शैक्षणिक शहरातील गोष्ट मर्दानी 2 मध्ये दाखविण्यात आली आहे. तेथे शिकणाऱ्या काही मुलींवर अनोळखी व्यक्तीकडून बलात्कार व हत्या होते. याचा शोध घेण्यासाठी इन्स्पेक्टर आकाशपाताळ एक करते व त्याला शोधते, अशी या चित्रपटाची कहाणी आहे. पण या चित्रपटात थेट कोटा या शहरालाचा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या या शहाराबाबत असे दाखविणे योग्य नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बिर्ला हे कोटाचे रहिवासी आहेत, तसेच ते कोटाचे खासदारही आहेत. 

धक्कादायक! अभिनेत्रीला दुखापत, शुटिंगही थांबले!

Image result for om birla

'मर्दानी 2'मध्ये दाखविण्यात आलेली गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे, असे ट्रेलरमध्ये म्हणले आहे. बिर्ला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, असे थेट शहराचे नाव घेणे हे त्या शहराच्या प्रतिमेच्या विरोधात आहे. आम्ही चित्रपटाच्या अधिकृत लोकांशी बोलून यावर तोडगा काढू असे त्यांनी यावेळी सांगितले. कोटा शहरातील नागरिकांनीही या कथेवर आणि कोटा शहराचे नाव घेण्याबाबत निषेध दर्शविला आहे. 

Image result for mardaani 2

या चित्रपटाचे दिग्दर्शन गोपी पुथरन करत आहेत, तर राणी मुखर्जी पुन्हा एकदा पोलिस इन्स्पेक्टर शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसले. राणीच्या पहिल्या मर्दानीलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha Speaker Om Birla objection on Mardaani 2 for Kota