बॉलिवूडची फॅशन क्वीन असलेल्या 'या' अभिनेत्रींचे लंडनमधील आलिशान घर... 

संतोष भिंगार्डे
Sunday, 19 July 2020

लंडनमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला तेव्हा सोनम आणि आनंद आहुजा यांनी काही काळ लंडनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता सोनम जवळपास चार एक महिने भारतात राहिल्यानंतर पुन्हा लंडनमध्ये परतली आहे. लग्नानंतर सोनम तिचा पती आनंद आहुजाबरोबर लंडनमध्ये शिफ्ट झाली आहे.

मुंबई : बॉलिवूडची फॅशन क्वीन सोनम कपूर लॉकडाऊनदरम्यान पुन्हा लंडनमध्ये आपल्या घरी पोहोचली आहे. सोनमने स्वतः लंडनमध्ये पोहोचल्याची बातमी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करून दिली. तिच्या लंडनमधील घराचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.  

लंडनमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला तेव्हा सोनम आणि आनंद आहुजा यांनी काही काळ लंडनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता सोनम जवळपास चार एक महिने भारतात राहिल्यानंतर पुन्हा लंडनमध्ये परतली आहे. लग्नानंतर सोनम तिचा पती आनंद आहुजाबरोबर लंडनमध्ये शिफ्ट झाली आहे. आनंद आहूजाचा लंडनमध्ये स्वत:चा व्यवसाय आहे. लंडनमधील सर्वात महागड्या एरियात आनंद आणि सोनम यांचे घर आहे. सोनम-आनंदचा बंगला वेस्ट लंडनच्या नॉटिंग हिलमध्ये आहे. सोनमचे लंडन हे घर तिच्या दिल्लीच्या घराइतकेच सुंदर आणि आलिशान आहे. २०१९ मध्ये अनिल कपूर आपल्या कुटुंबासमवेत ख्रिसमसमध्ये लंडनमध्ये सोनमकडे गेले होते. कपुर आणि आहुजा यांच्या ख्रिसमस समारंभाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये सोनमचे घरदेखील दिसते.  

Image may contain: 14 people, people sitting and indoor

सोनमने अनेक सजावटीच्या वस्तूंनी आपले घर सजविले आहे. संपूर्ण घरात लाकडी फ्लोअरिंग आहे. हॉलमध्ये मौल्यवान कार्पेट्स लाकडी फ्लोअरिंगवर पसरलेली आहेत. हॉलची लाईट रंगाची भिंत झाडं, फुले आणि पक्ष्यांच्या अतिशय सुंदर चित्रांनी सजली आहे. संपूर्ण घराचे आतील भाग अशा प्रकारे केला गेला आहे की घराला आतून इंग्रजी रूप मिळते. बेडरूममध्ये खोलीच्या एका कोपऱ्यात त्यांनी महागड्या फोटो फ्रेम्समध्ये लावले आहेत. ही खोली ग्रीन थीमसह सजवली आहे. वुड फर्निचरमध्ये हिरवा रंग असतो, म्हणून दिव्याच्या शेड्स आणि सोफा खुर्च्या देखील हिरव्या आहेत. खोलीत पांढर्‍या प्रकाशाऐवजी पिवळा लाईट वापरला आहे, ज्यामुळे खोलीत उबदारपणा जाणवतो.  

सोनम अनेकदा तिच्या हॉलचे फोटो शेअर करत असते. लंडन हे सर्वात सुंदर आणि थंड शहर आहे. या शहरात सोनम-आनंदने त्यांचे घर बांधले आहे जे अतिशय स्टायलिश आणि आलिशान आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Look at actress Sonam Kapoors luxurious house in London