Bigboss 13  : फॅमिली विक ठरणार गेम चेंजर; पाहा कोण कोण येणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

बिगबॉसच्या घरात नातेवाईकांनी प्रवेश केल्यानंतर सर्व सदस्यांना फ्रिझ करण्यात येणार आहे. त्यांनतर नातेवाईक घरातील सदस्यांशी संवाद साधणार आहे. नातेवाईक घरातील सदस्यांना त्यांचा कोण मित्र आहे, कोण शत्रु सांगण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा बिगबॉसचा गेम पलटी शकतो​

पुणे : बिगबॉस 13 चा सिजन आज पर्यंत सर्व बिगबॉस सिजनमध्ये हिट ठरलेला आहे. यंदा बिगबॉसच्या घरातील सर्व सभासदांनी प्रेक्षकांची मन जिंकले आहेत. टिआरपी रेटींगमध्ये गेले 15 आठवडे बिगबॉस 13 नंबर एक स्थानी आहे. याचा आनंद नुकताच सलमान खानने बिगबॉसच्या घरात जाऊन केक कापून घरच्यांसह साजरा केला. बिगबॉसचा हा सिजन इतका हिट ठरला आहे की, हा ,सिझन 5 आठवडयांनी वाढविला आहे. बिगबॉसच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरु केली असून या आठवड्यात फॅमिली विक सुरु आहे. 
Image result for siddharth shukla mom
बिगबॉसच्या घरातील सर्व सदस्यांचे नातवाईक भेटीस येणार आहे. मधुरिमा तुली, शेफाली जरीवाला, विशाल आदित्य सिंग हे वाईल्ड सदस्य उशीरा बिगबॉसच्या घरामध्ये आले परंतू बाकी 7 सदस्य गेल्या तीन महिण्यांपासून घरच्यांपासून दुर आहेत.  त्यामुळे हा आठवडा बिगबॉसच्या घरातील सदस्य आणि त्यांचे चाहते इमोशनल झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Krushna Abhishek (@krushna30) on

बिगबॉसच्या पहिल्या दिवशी आरती सिंगचा भाऊ कृष्णा अभिषेक, शेहनाझ कौर गिलचे वडिल संतोष सिंग सुख, माहिरा शर्माची आई सानिया शर्मा, विशाल आदित्य सिंगचा भाऊ कुणाल सिंग, शेफाली जरीवालाचे पती पराग त्यागी आज घरात येणार आहेत.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

"बात, बात पे बात बनाते हैं लोग बिना बात के भी,बात बनाते हैं लोग बनाते बात,तो बात बात में बतलाते हैं लोग जो हुयी ही नहीं,वो बात भी बड़ी ख़ूबसूरती से समझाते हैं लोग बनाकर बात इतनी,न जाने क्या पाते हैं लोग कान लगाकर सुन ; बना रहे बात,आते जाते लोग" #mylove #belief #trust #lovemywife #friendship #bestwife #beingsalmankhan #salmankhan @colorstv @endemolshineind #backstabberparaschabra #bigboss13 #mana #mywinner #gotigress

A post shared by Parag Tyagi (@paragtyagi) on

दुसऱ्या दिवशी सिध्दार्थ शुक्लाची आई रिता शुक्ला, पारस छाब्राची आई रुबी छाब्रा, मधुरीमा तुलीची आई विजया तुली, आसिम रियाजचा भाऊ उमर रियाज आणि रश्मी देसाईचा भाऊ गौरव देसाई घरात येणार आहे. Image result for gurav desai and rashmi desai

 

बिगबॉसच्या घरात नातेवाईकांनी प्रवेश केल्यानंतर सर्व सदस्यांना फ्रिझ करण्यात येणार आहे. त्यांनतर नातेवाईक घरातील सदस्यांशी संवाद साधणार आहे. नातेवाईक घरातील सदस्यांना त्यांचा कोण मित्र आहे, कोण शत्रु सांगण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा बिगबॉसचा गेम पलटी शकतो. 

shehnaaz gill

घरातील सदस्यांच्या प्रवेशाचा एक प्रोमो बिगबॉसने प्रसिध्द केला आहे. या प्रोमोमध्ये कृष्णा अभिषेक त्याच्या मुलांना घेऊन घरात आला आहे. त्याला पाहून आरती खुप खुश आहे. अभिषेक आरतीला, तुझा भाऊ असल्याचा मला अभिमान आहे असे सांगत आहे. तर शेहनाझचे वडिल तिला सिध्दार्थ शुक्ला आणि पारस छाब्रापैकी तिचा मित्र कोण आणि शत्रु कोण हे सांगणार आहे. माहिराची आई पारसला तुझी बाहेर चांगली गर्लफ्रेंड आहे तर मग माहिराचा चांगला मित्र म्हणून राहा असे प्रेमात सांगत आहे. हा प्रोमो  पाहून तर फॅमिली विक बिगबॉसच्या घरातील सदस्यांसाठी खूप इमोशनल आणि गेम चेंजर ठरणार आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors TV (@colorstv) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Look whos Coming Big Boss 13 House for Family week