वजन कमी कर; नाही तर... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

बॉलीवूडमध्ये करिना कपूरने झिरो फिगर केल्यानंतर जणू काही सगळ्याच अभिनेत्रींमध्ये वजन कमी करण्याची लाट आली होती.

बॉलीवूडमध्ये करिना कपूरने झिरो फिगर केल्यानंतर जणू काही सगळ्याच अभिनेत्रींमध्ये वजन कमी करण्याची लाट आली होती. जो तो आपण स्लीमट्रीम दिसावे म्हणून खटपट करत होता. याआधी आपण अभिनेत्रींना अगदी शेवगेच्या शेंगेप्रमाणे पाहिले नसले, तरी त्या बारीकच होत्या.

अशाही काही अभिनेत्री होत्या ज्यांनी आपल्या भूमिकेसाठी वजन वाढवल्याचीही उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ विद्या बालनने सिल्क स्मिताच्या भूमिकेसाठी आपले वजन वाढवले होते; तर मराठीतही "वजनदार' या चित्रपटासाठी प्रिया बापट, सई ताम्हणकर यांनी आपले वजन वाढवले होते. पण आजकाल अभिनेत्रींनी बारीक असणे ही गरज बनली आहे. पण "लाईफ ओके' चॅनेलवरील "मे आय कम इन मॅडम' या मालिकेत संजना या ऑफिसमधील बॉसची भूमिका करणारी नेहा पेंडसे हिला या मालिकेसाठी वजन कमी करण्याची सक्त ताकीद देण्यात आलीय.

या मालिकेतील संजनाची भूमिका नेहाने खूप गाजवली आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेसाठी नेहाला आकर्षक दिसण्याची गरज आहे. पण तिच्या वाढलेल्या वजनामुळे भूमिकेवर परिणाम होत असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिने वजन कमी केले नाही तर तिला मालिकेतून काढून टाकण्याची ताकीद निर्मात्यांनी दिलीय. 

Web Title: Lose weight; Otherwise ...