आलिया करणार लव्ह मॅरेज 

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

आलिया भट्टने "स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवनबरोबर बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. तिघांचाही तो पहिलाच सिनेमा असला, तरीही त्यात त्यांची केमिस्ट्री अफलातून होती. चित्रपटाच्या यशानंतर काही दिवसांतच आलियाचे नाव दोघांशी जोडले जाऊ लागले. ती मात्र आम्ही तिघे बेस्ट फ्रेंड असल्याचे नेहमीच सांगत राहिली. सिद्धार्थबरोबर तिचे अफेअर असल्याची चर्चाही रंगली. त्याच्याशी असलेल्या रिलेशनशिपवरही ती अद्याप काहीही बोललेली नाही. तिने वरुणबरोबर तीन आणि सिद्धार्थबरोबर दोन चित्रपट केलेत; पण कोणाबरोबरही आपले काही रिलेशन असल्याचे उघड उघड सांगितलेले नाही.

आलिया भट्टने "स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवनबरोबर बॉलीवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री केली. तिघांचाही तो पहिलाच सिनेमा असला, तरीही त्यात त्यांची केमिस्ट्री अफलातून होती. चित्रपटाच्या यशानंतर काही दिवसांतच आलियाचे नाव दोघांशी जोडले जाऊ लागले. ती मात्र आम्ही तिघे बेस्ट फ्रेंड असल्याचे नेहमीच सांगत राहिली. सिद्धार्थबरोबर तिचे अफेअर असल्याची चर्चाही रंगली. त्याच्याशी असलेल्या रिलेशनशिपवरही ती अद्याप काहीही बोललेली नाही. तिने वरुणबरोबर तीन आणि सिद्धार्थबरोबर दोन चित्रपट केलेत; पण कोणाबरोबरही आपले काही रिलेशन असल्याचे उघड उघड सांगितलेले नाही. तिच्या आगामी "बद्रीनाथ की दुल्हनियॉं'मध्ये ती पुन्हा वरुणसोबत आहे. त्यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या लग्नाच्या कल्पना स्पष्ट केल्यात. तुला लग्नासाठी कसा मुलगा हवाय, असा प्रश्‍न तिला केला असता ती म्हणाली, "तो' मुलगा कसा आहे त्यापेक्षा माझं त्याच्याबरोबर कसं रिलेशनशिप आहे, हे महत्त्वाचे आहे. तो माझा चांगला मित्र असला पाहिजे. त्याचे आणि माझे विचार जुळले पाहिजेत. मी लग्नानंतरही काम करणे सोडू शकत नाही, तेव्हा तो मला समजून घेणारा असला पाहिजे. मी ऍरेंज मॅरेज तर अजिबातच करू इच्छित नाही. मी लव्ह मॅरेजच करणार... आलियाच्या खुलाशानंतर आता ती सिद्धार्थची निवड करते की वरुणची, हे लवकरच कळेल. 

Web Title: love marriage alia bhatt