esakal | साई पल्लवी आणि नागा चैतन्यची 'लव स्टोरी': ट्रेलर व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

साई पल्लवी आणि नागा चैतन्यची 'लव स्टोरी': ट्रेलर व्हायरल

साई पल्लवी आणि नागा चैतन्यची 'लव स्टोरी': ट्रेलर व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - टॉलीवूडमध्ये साई पल्लवीला(sai pallavi) आता मोठी अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. ती सध्याच्या घडीला टॉपची अभिनेत्री आहे. तिनं कमी वयात मोठं यश संपादन केलं आहे. ती जशी उत्तम अभिनेत्री आहे त्यापेक्षाही ती बेस्ट डान्सरही आहे. आपल्या अभिनयानं केवळ टॉलीवूडच नाही तर बॉलीवूडमध्येही तिनं वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर साईच्या आगामी लव स्टोरी (love story) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला दहा लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. साई पल्लवीचा बॉलीवूडमध्येही मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या साईच्या कित्येक चित्रपटांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे. दिग्दर्शक शेखर कामुल्ला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

लव स्टोरीमध्ये नागा चैतन्य साईबरोबर (naga chaitanya) दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा होती. आता त्याच्या ट्रेलरनं साईच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हा चित्रपट येत्या 24 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. वास्तविक यापूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे लव स्टोरी प्रदर्शित व्हायला विलंब झाला. त्यानंतर निर्माते आणि दिग्दर्शक यांनी त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल केल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. कोरोनामुळे बॉलीवूड आणि टॉलीवूडमधील कित्येक मोठ्या बॅनरच्या चित्रपटांना माघार घ्यावी लागली होती. त्याचा मोठा आर्थिक तोटाही त्यांना सहन करावा लागला आहे.

लव स्टोरीविषयी सांगायचं झाल्यास त्यात रवनाथ आणि मोनिका यांची कथा मांडण्यात आली आहे. एका आगळ्या विषयांवर हलक्या फुलक्या स्वरुपात लव स्टोरीची कथा सादर करण्यात आली आहे. नागा चैतन्य आणि साई पल्लवी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेयर करणार आहेत. लव स्टोरीचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याचे कळताच दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त करताना निर्माते यांनी लिहिलं आहे की, आयुष्यातील छोट्या मोठ्या प्रसंगांना चित्रबध्द करुन तो अनुभव वेगळ्या पद्धतीनं सादर करण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करण्यास उत्सूक आहोत.

हेही वाचा: साई पल्लवी ते समंथा; मेकअपशिवायही सुंदर दिसतात या दाक्षिणात्य अभिनेत्री

हेही वाचा: Video: सेम टू सेम सिद्धार्थ शुक्ला, चाहते झाले भावूक

loading image
go to top