'लकी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेते जितेंद्र कपूर यांची उपस्थिती़

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 जानेवारी 2019

ट्रेलर लाँच सोहळ्याला 'लकी' चित्रपटाचा मनोरंजक ट्रेलर दाखवण्यासोबतच चित्रपटाचे नुकतेच लाँच झालेले ‘कोपचा’ गाणेही दाखवण्यात आले. जितेंद्र कपूर यांनी अभिनेता अभय महाजनसोबत 'कोपचा' गाण्यावर डान्स केला.

बी लाइव्ह प्रस्तूत 'लकी' चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा सोहळा नुकताच झाला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते, बॉलीवूड अभिनेते जितेंद्र कपूर आणि डिस्को किंग बप्पी लाहिरी यांची उपस्थिती.

ट्रेलर लाँच सोहळ्याला 'लकी' चित्रपटाचा मनोरंजक ट्रेलर दाखवण्यासोबतच चित्रपटाचे नुकतेच लाँच झालेले ‘कोपचा’ गाणेही दाखवण्यात आले. जितेंद्र कपूर यांनी अभिनेता अभय महाजनसोबत 'कोपचा' गाण्यावर डान्स केला.  

डिस्को किंग बप्पी लाहिरींना सिनेसृष्टीत यंदा 50 वर्ष पूर्ण होत असताना त्यांचा मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायक म्हणून 'कोपचा' गाण्याद्वारे डेब्यू केला आहे. लाहिरी यावेळी म्हणाले, 'ज्या मराठी मातीने मला हे यश मिळवून दिले, त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये माझा 50 वर्षांनंतर पार्श्वगायनात डेब्यू होतोय. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हे गाणे माझ्या स्टाइलचे असल्याने मला विशेष आनंद होत आहे.'

ट्रेलर लाँच सोहळ्याला बॉलीवूड अभिनेता तुषार कपूरही उपस्थित होता. संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारीला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.  
 

lucky marathi movie

पुणेकरांचे मराठी चित्रपटांना भरघोस प्रेम -

‘लकी’ चित्रपटाच्या स्टारकास्टने नुकतीच पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधला. लकीमधून अभिनेत्री दिप्ती सती मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. दिप्ती म्हणाली, 'मी आजवर संजयदादांचे सिनेमे पाहिले होते. पण एक दिवस त्यांच्या सिनेमाची हिरोइन बनून मी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करेन असं मला कधी वाटलं नव्हतं. तसेच मॉडेलिंगच्या निमित्ताने मी पुण्यात यायचे. पण आज पुण्यात माझी होर्डिंग्स् लागलेली पाहणे, हे स्वप्नवत आहे.' चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, 'माझ्या प्रत्येक सिनेमाच्यावेळी पुण्यातल्या पत्रकारांना भेटणे आणि पुण्यात चित्रपटाचा प्रिमियर करणे हा माझा रिवाज असतो. 'लकी' चित्रपट पुणेकरांना आवडेल, याची मला खात्री आहे.'

'लकी' चित्रपटाचा ट्रेलर -


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lucky marathi movie trailer launch program