शूर्पनखेची लक्ष्मणला शिवी, भगवान शंकर, कालीमातेला ढकलायला लावली गाडी

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 27 November 2020

 साधारण मागील दोन आठवड्यांपूर्वी लुडो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. त्यातील काही प्रसंगात हिंदू देवदेवतांचा अपमान झाल्याचे दाखविण्यात आले आहे.

मुंबई -ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणा-या चित्रपट आणि मालिका यांच्यावर सेन्सॉरचे बंधन घालण्याचे प्रयत्न सुरु असताना त्यावरुन वाद झडताना दिसत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सर्जनशीलता यावर मर्यादा येत असल्याचे काहींनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून प्रदर्शित झालेल्या चित्रपट आणि मालिकांना ट्रोल केले जात आहे.  त्यातून भावना दुखावल्या गेल्याचे नेटक-यांचे म्हणणे आहे. सध्या लुडो चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसु यांना ट्रोल केले गेले आहे.

लुडो चित्रपटात दाखविण्यात आलेल्या काही प्रसंगातून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचे नेटक-यांनी म्हटले आहे.साधारण मागील दोन आठवड्यांपूर्वी लुडो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. त्यातील काही प्रसंगात हिंदू देवदेवतांचा अपमान झाल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यावरुन नेटक-यांनी बसु यांना धारेवर धरले आहे. ज्याप्रमाणे राजकुमार हिरानी यांनी पीके तयार केला होता तसे अनुराग बसु यांनी लुडो तयार केल्याची टीका निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यावर करण्यात आली आहे.

लुडो मधील एका दृष्यात अभिनेता राजकुमार राव याने शूर्पणखेची भूमिका केली आहे. ते पात्र रंगवत असताना एका सहकलाकाराच्या हातातली तलवार त्याच्या नाकाला लागून नाकातून रक्त आल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यावेळी स्टेजवरच शूर्पनखा लक्ष्मणला रागाच्या भरात शिव्या देत असल्याचे दृश्य चित्रित करण्यात आले आहे.

तसेच अभिषेक बच्चन एका लहान मुलीला गाडीतून घेऊन जात असताना ती गाडी बंद पडल्यावर ती गाडी लोटण्यासाठी गाडीत बसलेल्या भगवान शंकर, कालीमाता यांना गाडी लोटण्याचा आग्रह करतो. या दृश्यांमुळे लुडोला टीकेचा सामना करावा लागत आहे.

रेखा म्हणे,'मी काही दाखवायची वस्तू आहे का?

याविषय़ी बोलताना एका नेटक-याने म्हटले आहे की, अशाप्रकारे हिंदूच्या भावना का दुखावल्या जात आहेत हे कळायला काही मार्ग नाही. असे विकृत चित्रण योग्य नाही. यामुळे वेगळ्या प्रकारचा संदेश समाजात आहे.

'कोणं म्हटलं,वेबसीरीजच्या माध्यमातून संस्कृतीचा अपमान होतो'

याशिवाय रविंद्रनाथ टागोर यांच्या काबूलीवाला या कथेवर आधारित चित्रपटांतूनही मुळ कथेची मोडतोड करुन भावना दुखावल्या गेल्याचे नेटक-य़ांनी म्हटले आहे. लुडोचे दिग्दर्शक अनुराग बसु यांनी हिंदू देव देवता यांना अपमानित करण्याचे ठरवले आहे. त्यांना ज्याप्रकारे चित्रपटांतून दाखविण्यात आले आहे ते चूकीचे असल्याचे नेटकरी म्हणत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ludo movie director Anurag basu trolled for Use of Abusive Language while showing a scene