प्रियंका रुसली, मग काय निकनं थेट हिंदीत 'मान मेरी जान' ऐकवलं!| Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maan Meri Jaan King Song Nick Jonas Priyanka Chopra

Viral Video : प्रियंका रुसली, मग काय निकनं थेट हिंदीत 'मान मेरी जान' ऐकवलं!

Maan Meri Jaan King Song Nick Jonas Priyanka Chopra : बॉलीवूडच्या प्रियंकाची आणि निक जोनासची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. प्रियंका आता भलेही हॉलीवूडची मोठी सेलिब्रेटी झाली असेल पण बॉलीवूडवरती देखील ती बारकाईनं लक्ष ठेवून असते. गेल्या काळात तिनं तिच्या निर्मिती संस्थेच्या वतीनं वेगवेगळ्या कलाकृती तयार करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसून आले आहे.

सध्या सोशल मीडियावर प्रियंकाचा पती निक जोनासचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यानं गायलेलं ते हिंदी गाणं नेटकऱ्यांना भलतंच आवडलं आहे. तू मान मेरी जान असे त्या गाण्याचे बोल आहे. मुळ भारतीय असलेल्या या गाण्याला भारतातून मिळालेला प्रतिसाद सर्वांना माहिती आहे. तरुणाईच्या सर्वाधिक आवडीच्या गाण्यांमध्ये या गाण्याचा समावेश करावा लागेल.

Also Read - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

प्रख्यात गायक किंगनं ते गाणं कंपोझ आणि गायलं होतं. त्या गाण्याला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. सध्या वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये हे गाणं एक वेगळेच समीकरण बनलं आहे. अशातच हॉलीवूडच्या निक जोनासला त्याची भुरळ पडली नसती तर नवल म्हणावे लागले असते. निकनं आता सोशल मीडियावर त्या गाण्याची त्याच्या आवाजातील झलक सादर केली आहे.

निकनं मान मेरी जान हिंदीमध्ये गाण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या त्या प्रयत्नाचे चाहत्यांनी कौतूक केले आहे. तर नेटकऱ्यांनी प्रियंकानं निकनं अखेर हिंदी शिकवलं असं म्हटले आहे. आतापर्यत हजारो लाईक्स आणि कमेंटस या गाण्याला मिळाले आहेत. यापूर्वी देखील निकनं हिंदीतून वेगवेगळी गाणी सादर करण्याचा प्रयत्न केला होता.