
Maanvi Gagroo ने ज्याच्याशी बांधली लग्नगाठ तो कुमार वरुण आहे तरी कोण? कॉमेडीच्या जगात आहे मोठं नाव
Maanvi Gagroo Wedding: सध्या लग्नाचा मौसम पुन्हा सुरु झालाय. फोर मोर शॉट्स प्लिज, ट्रीपलिंग, पिचर्स अशा लोकप्रिय वेबसिरीजमध्ये काम केलेली अभिनेत्री मानवी गागरू हिने आज गुपचूप लग्न केलं.
मानवीने तिचा बॉयफ्रेंड कुमार वरुण सोबत लग्न केलं. मानवी लोकप्रिय अभिनेत्री आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण मानवीचा नवरा कुमार वरुण सुद्धा प्रसिद्ध कॉमेडियन आहे. पैसा आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून कुमार ऐशोआरामात आयुष्य जगतोय.
(maanvi gagroo marriage who is kumar varun age ex wife career personal life)
कुमार वरुणचा जन्म 19 नोव्हेंबर 1985 रोजी झाला. तो एक स्टँड-अप कॉमेडियन, लेखक आणि व्यावसायिक आहे. कुमार वरुण मूळचा बिहारमधील जेहानाबादचा असून त्याचा कॉमेडी व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल झाल्यानंतर त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली.
कुमार इंजिनियर असून त्याने दिल्लीतील मॅनेजमेंट स्टडीज फॅकल्टीमधून एमबीए केले आहे. कुमार वरुणचा 'एमबीए लाइफ' हा स्टँड-अप कॉमेडी व्हिडिओ आहे.. जो सर्वांच्या आवडीचा आहे.
कुमार वरुण आणि राहुल सुब्रमण्यन यांनी 'रॅंडम चिकीबम' नावाचे YouTube चॅनल सुरू केले. कुमारचा हजरजबाबीपणा आणि त्याच्या विनोदी स्वभावामुळे लोक त्याच्यावर प्रेम करतात. कुमार वरुणचे विविध स्टँड-अप कॉमेडी व्हिडिओ YouTube वर आहेत.
तो YouTube आणि Spotify वर अनेक पॉडकास्टमध्ये देखील दिसला आहे. कुमार स्टॅन्ड अप कॉमेडी क्षेत्रात नावाजलेला असून तो आर्थिकदृष्ट्या सुद्धा श्रीमंत आहे. कुमार वरुणची एकूण संपत्ती सुमारे $20 दशलक्ष आहे.
सुप्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खान, तन्मय भट आणि राहुल सुब्रमण्यमच्या सोबतच कुमार वरुणचं नाव घेतलं जातं. आशिष चंचलानी आणि भुवन बाम यांच्याशी कुमार वरुणची खास मैत्री आहे.
कुमार वरुणचं याआधी सुद्धा लग्न झालं आहे. मानवीशी लग्न करण्यापूर्वी कुमारचे लग्न दीप्ती अस्थाना सोबत झालं होतं. दीप्ती हि एक नॅशनल जिओग्राफिक फोटोग्राफर आहे. लग्नानंतर काही वर्षांनी या दोघांनी घटस्फोट घेतला.
मानवी आणि कुमार या दोघांनी वयाच्या ३६ व्या वर्षी आज एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. दोघांनी कोर्ट मॅरेज पद्धतीने गुपचूप लग्न उरकले.
कागदपत्रांवर सही करून मानवी आणि कुमारने लग्नावर शिक्कामोर्तब केला. मानवी आणि कुमारच्या लग्नाची खबर ऐकताच दोघांच्या फॅन्सना सुखद धक्का बसला.