मधुबाला यांच्या जन्मदिनी गुगलचे डुडल

madhubala
madhubala

'जब प्यार किया तो डरना क्या'.. या गाण्यातल्या मधुबाला सगळ्यांच्याच स्मरणात आहेत. आज त्यांचा जन्मदिवस.. प्रेमाचे पतिक असलेल्या या अभिनेत्रीचा जन्मदिवस आज 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी असावा हा योगायोगच..म्हणून की काय पण त्या खऱ्या आयुष्यातही रोमॅंटीक होत्या असं म्हटलं जातं...

त्यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलने डूडलद्वारे त्यांना आदरांजली वाहिली आहे. गुगलने मधुबाला यांच्या गाजलेल्या 'मुघल ए आझम' या चित्रपटामधील गाण्यातील नृत्य करीत असलेले खास डुडल केले आहे.

१४ फेब्रुवारी १९३३ रोजी मधुवाला यांचा जन्म झाला. त्यांच मूळ नाव मुमताज बेगम जहाँ देहलवी होते.  'बसंत' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'नीलकमल' या चित्रपटातील मधुबालांच्या मुख्य भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली. मधुबालाने केवळ चित्रपटसृष्टीवर राज्य केले नाही तर तिने अनेकांच्या मनावरही अधिराज्य केले.

२३ फेब्रुवारी १९६९ रोजी मधुबाला यांचे (३६) निधन झालं. मधुबाला यांना हृदयाचा त्रास होता. मधुबाला यांच्या निधनानंतर दोन वर्षानी म्हणजे १९७१ मध्ये त्यांचा 'जलवा' हा चित्रपट प्रदर्शित झाला. 

त्यांची गाजलेली गाणी आज गुणगुण्याचा मोह कित्तेकांना आवरला नसेल. मधुबाला यांचं तुमच्या आठवणितलं आणि आवडतं गाणं कोणतं..?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com