राहुलजी, 'मर्सल'ला पाठिंबा दिलात, मग 'इंदू सरकार'ला का नाही?

सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

एका कार्यक्रमात बोलताना मधुर म्हणाले, मला राहुल यांची भूमिका कळली नाही. त्यांनी मर्सलला पाठिंबा दिला आहे. तर मग माझा इंदू सरकार हा चित्रपट ज्यावेळी प्रदर्शित झाला, त्यावेळी त्यांनी त्यांची भूमिका का मांडली नाही. त्यावेळी माझा हा चित्रपट प्रदर्शितही होऊ दिला नाही. पुण्यासह मी पत्रकार परिषद घेण्यासाठी आलो असता, काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यानी हुल्लडबाजी करत ती पत्रकार परिषद होऊ दिली नाही. त्यावेळी राहुलजी कुठे होते? मर्सलला एक न्याय तर इंदू सरकारला दुसरा असं का?

मधुर भंडारकरांनी विचारला राहुल गांधींना प्रश्न 

मुंबई : मर्सलमधील सवादांनी सध्या भाजपची झोप उडवली आहे. भाजप समर्थकांनी या चित्रपटातील संवाद वगळण्याची मागणी केली आहे. तर रजनीकांत यांनी हा चित्रपट अत्यंत महत्वाचा असून हा विषय मांडल्याबद्दल सिनेमाच्या टीमचं अभिनंदन केलं आहे. त्याचेवळी राहुल गांधी यांनीही भाजपवर टीका करत हा चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. राहुल यांच्या या भूमिकेमुळे दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना मात्र प्रश्न पडले आहेत. 

एका कार्यक्रमात बोलताना मधुर म्हणाले, मला राहुल यांची भूमिका कळली नाही. त्यांनी मर्सलला पाठिंबा दिला आहे. तर मग माझा इंदू सरकार हा चित्रपट ज्यावेळी प्रदर्शित झाला, त्यावेळी त्यांनी त्यांची भूमिका का मांडली नाही. त्यावेळी माझा हा चित्रपट प्रदर्शितही होऊ दिला नाही. पुण्यासह मी पत्रकार परिषद घेण्यासाठी आलो असता, काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यानी हुल्लडबाजी करत ती पत्रकार परिषद होऊ दिली नाही. त्यावेळी राहुलजी कुठे होते? मर्सलला एक न्याय तर इंदू सरकारला दुसरा असं का?

खरंतर ही नक्कल आहे. इंदू सरकार आला त्यावेळी काॅंग्रेसच्या लोकांनी या चित्रपटाला विरोध केला. आता मर्सल आला तर त्यातील संवादांमुळे भाजप समर्थक या चित्रपटाला विरोध करत आहेत. ही राजकीय मानसिकतेची डुप्लिकेट काॅपी आहे, असंही मधुर यांनी स्पष्ट केले. 

Web Title: madhur bhandarkar asks rahul gandhi about his film indu sarkar esakal news