'माझ्या वेबसीरीजचं नाव तुमच्या चित्रपटाला देऊ नका': करण जोहरने केली कॉपी 

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 21 November 2020

भांडारकर यांनी सोशल मीडियावर याविषयी अधिक माहिती दिली आहे. विशेष म्हणजे करण जोहर यांना आपण या वेबसीरीजबद्दल सांगितले होते.  

मुंबई - बॉलीवूडमध्ये कधी कशाची चोरी होईल हे सांगता येत नाही. यापूर्वी अनेकांनी आपल्या स्क्रिप्टची चोरी झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये काही दिग्गजांची नावे आली आहेत. आता असेच एक नवे प्रकरण समोर आले आहे. त्यात बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सध्याचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर आणि अपूर्व मेहतावर आपल्या वेबसीरीजचे नाव चोरल्याचा आरोप केला आहे.

भांडारकर यांनी सोशल मीडियावर याविषयी अधिक माहिती दिली आहे. विशेष म्हणजे करण जोहर यांना आपण या चित्रपटाबद्दल सांगितले होते.  त्यांनी त्यांच्या चित्रपटाला मी दिलेलं नाव देणार असल्याचे सांगितले. यावर भांडारकर यांनी जोहर आणि मेहता यांना ते नाव न देण्याविषयी विनंती केली आहे.  बॉलीवूडमधील कलावंतांच्या पत्नींवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

‘Fabulous Lives of Bollywood Wives’ या सीरिजचा पहिला सीजन २७ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. या सीरिजमध्ये सीमा खान, महिप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या वेबसीरीजचे नाव ‘बॉलिवूड वाइव्ज’ असं आहे. त्याचवेळी करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ या सीरिजविषयी सांगितले.

आपण या नावाशी संबंधित  चित्रपट करत असून करण आणि अपूर्व यांनी हेच नाव त्यांच्या सीरिजला देणं चुकीचं आहे. या शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनकडे ( आय़एमपीपीए) याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
भांडारकर यांनी आपल्या वेब सीरीजचे नाव सेन्सॉर बोर्डाकडे रजिस्टर केले आहे.

Fabulous Lives of Bollywood Wives' an Indian version of “The Real  Housewives of Beverly Hills” on Netflix | News India Times

या चित्रपटात शाहरूख खानची पत्नी गौरी खान, शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत आणि राजेश खन्नाची पत्नी डिंपल खन्ना यांच्या आयुष्यावर  आधारित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. करण जोहर आणि अपूर्व मेहताने मला या सीरिजचं नाव ‘बॉलिवूड वाइव्ज’ असं ठेवलं तर चालेल का? असं विचारलं होतं. 

मीदेखील याच नावाने चित्रपट करत आहे, त्यामुळे हे नाव ठेऊ नका, असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. तरीदेखील त्यांनी त्यांच्या सीरिजचं नाव ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ असं ठेवलं. हे अत्यंत चुकीचं आहे. कृपा करुन माझ्या प्रोजेक्टचं नुकसान करु नका. माझी नम्र विनंती आहे तुम्ही या सीरिजचं नाव बदला”, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhur Bhandarkar requests Karan Johar to change the title of his web show