Aai Kuthe Kay Karte: अखेर अरुंधतीने थाटला नवा संसार.. लग्नाच्या पहिल्याच दिवशी आशुतोष म्हणाला, आज.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

madhurani prabhulkar shared post about her ani ashutosh newly married life in Aai Kuthe Kay Karte serial star pravah

Aai Kuthe Kay Karte: अखेर अरुंधतीने थाटला नवा संसार.. लग्नाच्या पहिल्याच दिवशी आशुतोष म्हणाला, आज..

Madhurani Prabhulkar: 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे मधुराणी प्रभुलकर हे नाव आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा खूप सुंदर अशा वैचारिक पोस्ट शेअर करताना दिसते.

नुकतीच तिची महिला दिनाची पोस्ट चर्चेत होती. त्यानंतर तिनं 'अरुंधती'च्या या वयातील लग्नाविषयी मत मांडले. ती साकारत असलेली अरुंधती आता नव्या नात्यात अडकली आहे. नवा संसार तिने सुरू केला आहे. याच विषयी आज मधुराणी बोलली आहे.

(madhurani prabhulkar shared post about her ani ashutosh newly married life in Aai Kuthe Kay Karte serial star pravah)

'आई कुठे काय करते' मालिकेत नुकताच आशुतोष आणि अरुंधतीचा लग्नसोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नावरनं देशमुखांच्या घरात तुंबळ युद्ध रंगलेलं पहायला मिळालं. पण सर्वांचा विरोध झुगारून अरुंधतीने हे लग्न केलेच.

आता अरुंधती आणि आशुतोष यांनी नव्या संसाराची सुरुवात केली आहे. नुकताच याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अरुंधती आणि आशुतोष आपल्या नव्या नात्याची सुरुवात करताना दिसत आहेत.

या प्रोमोमध्ये दोघेही नाश्त्याची तयारी करताना दिसत आहे. पण अरुंधती ऐवजी आशुच किचनमध्ये असतो. तो चहा करत असतो. ते करताना अरुंधती म्हणते, देशमुखांकडे नाश्त्याला चार पाच पदार्थ व्हायचे. कुणाला पोहे आवडायचे नाहीत तर कुणाला उपमा.. त्यावर आशुतोष म्हणतो, पण तुला काय आवडतं.. आणि अरुंधती स्तब्ध होते, कारण इतक्या वर्षात तिला काय आवडतं हे कुणी विचारलेलंच नसतं.

त्यावर आशुतोष म्हणतो, मग आज दिवसभर तुला काय आवडेल तेच आपण करायचं. हाच व्हिडिओ मधुराणीने शेयर केला आहे. सोबत एक कॅप्शन दिले आहे.

''आशु : आणि तुला काय आवडतं?
अरु : मला ?
( अरु स्तब्ध)
आशु : काय झालं ?
अरु : असं विचारलंच नाही कधी कुणी...
नवीन नात्याची नवी सुरुवात.....!!!!'' असं मधुराणी म्हणाली आहे. हा व्हिडिओ सध्या बराच चर्चेत आहे. अरुंधती आणि आशुतोष यांचा नवा संसार कसा फुलतोय हे पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र आतुर आहेत.

टॅग्स :Marathi Serial