अनिल-माधुरीची पुन्हा जमणार जोडी!

बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

तेजाब, बेटा, पुकार असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिलेली जोडी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित आता पुन्हा एकदा चंदेरी पडद्यावर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंद्रकुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, याचं सध्या नाव टोटल धमाल असं असणार आहे. 

मुंबई : तेजाब, बेटा, पुकार असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिलेली जोडी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित आता पुन्हा एकदा चंदेरी पडद्यावर एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंद्रकुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून, याचं सध्या नाव टोटल धमाल असं असणार आहे. 

या चित्रपटात अजय देवगण, आर्शद वारसी, संजय दत्त अशी मंडळी आहेत. त्यात आता अनिल कपूर आणि माधुरी दीक्षितचं नाव अॅड झालं आहे. या चित्रपटाचा पुढचा कोणताही तपशील देण्यात आलेला नाही. पण बऱ्याच वर्षांनी माधुरी आणि अनिल एकत्र येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. 

Web Title: madhuri dikshit anil kapoor team up again total dhamaal esakal news