Madhuri: उफ्फ! तब्बल 20 वर्षांनी 'डोला रे डोला'वर थिरकली माधुरी, एकदा बघाच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jhalak Dikhhla Jaa 10: Madhuri Dixit, Amruta Khanvilkar dance to Dola Re Dola, Karan Johar calls it 'best moment'

Madhuri: उफ्फ! तब्बल 20 वर्षांनी 'डोला रे डोला'वर थिरकली माधुरी, एकदा बघाच..

Jhalak Dikhhla Jaa 10 : 'झलक दिखला जा' या डान्स रिएलिटी शोची सध्या बरीच चर्चा आहे. तब्बल पाच वर्षांनी हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता गश्मिर महाजनी आणि नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील असे तीन मराठी चेहरे या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. नुकताच एका आगामी भागाचा प्रोमो आउट झाला ज्यामध्ये अमृता आणि आशिष सोबत माधुरी दीक्षित चक्क 'डोला रे डोला' गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

'झलक दिखला जा 10'चा नुकताच एक प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये माधुरी वीस वर्षांपूर्वीच्या 'डोला रे डोला' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. माधुरीसोबत अमृता खानविलकर (amruta khanvilkar) आणि आशिष पाटील देखील 'डोला रे डोला'वर थिरकताना दिसत आहे. अपल्याला आठवत असेलच की माधुरी, ऐश्वर्या आणि शाहरुख खान यांनी 20 वर्षांपूर्वी 'देवदास' चित्रपट केला. याच अजरामर चित्रपटातील 'डोला रे डोला' हे गीत आजही आपल्याला नाचायला भाग पाडते. या गाण्यावर नुकतेच अमृता आणि आशिषने डान्स केला. त्यानंतर माधुरी दीक्षित यांनीही त्यांची अदा पेश केली. माधुरी (madhuri dixit) यांचे नृत्य पाहून करण जोहर, रोहित शेट्टी आणि नोरा फतेही तिघेही अवाक झाले.  

'झलक दिखला जा' या कार्यक्रमात अनेक कलाकारांच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. तर प्रत्येक आठवड्यात वेगवेगळे दिग्गज सेलिब्रिटी या कार्यक्रमाला भेट देत आहेत. झलक दिखला जा'च्या दहाव्या पर्वाच्या परिक्षणाची धुरा बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि नृत्यांगना नोरा फतेही (Nora Fatehi) सांभाळत आहे.