Happy Birthday Madhuri Dixit : अभिनय आणि नृत्याची 'मोहिनी' माधुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

माधुरीच्या करियरच्या सुरवातीच्या काळात तिचे नाव अभिनेता अनिल कपूर सोबत त्यानंतर अभिनेता संजय दत्त सोबत जोडले गेले होते. संजय दत्त सोबत 'साजन' चित्रपटादरम्यान माधुरीची जवळीक झाली.

बॉलिवू़डची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. सौंदर्यानं आणि नृत्यानं घायाळ करणाऱ्या माधुरीनं तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते. 

'तेजाब' ते 'कलंक' पर्यंत माधुरीने अभिनय आणि नृत्यात ठेवलेली सातत्यता जाणवते. माधुरीला तिच्या करियरच्या सुरवातीला यश मिळाले नाही. 1988 ला आलेला चित्रपट 'द्यावान' मध्ये अभिनेता विनोद खन्ना सोबत तिच्या किसिंग सीनने त्या काळात खळबळ उडाली होती. या सीनबद्दल खूप टीकाही झाली. 1988 मधीलच 'तेजाब' चित्रपट हा माधुरीच्या करियरमधील यशाची पहिली पायरी ठरला. या चित्रपटातील 'एक..दोन..तीन..' हे आजही आयकॉनिक गाणं मानलं जातं. 

madhuri

माधुरीच्या करियरच्या सुरवातीच्या काळात तिचे नाव अभिनेता अनिल कपूर सोबत त्यानंतर अभिनेता संजय दत्त सोबत जोडले गेले होते. संजय दत्त सोबत 'साजन' चित्रपटादरम्यान माधुरीची जवळीक झाली. पण हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. 1999 मध्ये माधुरीने डॉ. श्रीराम नेने सोबत लग्नं केलं. या दांम्पत्याला रियान आणि एरिन नेने ही दोन मुलं आहेत. 

वयाच्या तिसऱ्या वर्षापासून माधुरीने नृत्य शिकायला सुरवात केली होती. मराठी मुलगी माधुरी दीक्षित हिचे सगळेच करियर बॉलिवूडमध्ये झाले असले तरी मराठीवरचे तिचे प्रेम ती अनेकदा बोलून दाखवत असते. गेल्या वर्षी तिने 'बकेट लिस्ट' नावाचा पहिला मराठी चित्रपट केला.
 

madhuri

madhuri

madhuri

madhuri


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhuri Dixit Happy Birthday Special