'बलम पिचकारी'वर माधुरी अन् करिश्माचा भन्नाट डान्स.. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आठवले '90s' चे दिवसMadhuri Dixit, Karisma Kapoor Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhuri Dixit, Karisma Kapoor Viral Video

Viral Video: 'बलम पिचकारी'वर माधुरी अन् करिश्माचा भन्नाट डान्स.. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आठवले '90s' चे दिवस

Viral Video: माधुरी दिक्षित आणि करिश्मा कपूर ९०च्या दशकातील दोघीही टॉपच्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये सामिल आहेत. डान्सिंग दिवा म्हणू या दोघीही प्रसिद्ध आहेत. आजही दोघींचा फिटनेस हेवा वाटण्यासारखाच आहे. करिश्मा आणि माधुरीला एकत्र पाहिलं की डोक्यात येतो तो 'दिल तो पागल है' सिनेमा. या सिनेमाला चाहत्यांचे भरपूर प्रेम मिळाले. आता पुन्हा एकदा करिश्मा आणि माधुरीनं आपल्या डान्सनं चाहत्यांना वेड लावलं आहे. (Madhuri Dixit, Karisma Kapoor Dance Viral Video)

करिश्मानं जो व्हिडीओ शेअर केला त्यात ती आपली डान्स पार्टनर असलेल्या माधुरी दिक्षित सोबत ठुमके लगावताना दिसत आहेत. दोघी रणबीर कपूर आणि दीपिका पदूकोणचं गाणं 'बलम पिचकारी'वर शानदार डान्स करताना दिसत आहेत. करिश्मानं या व्हिडीओला शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,‘Dance of E̶n̶v̶y̶ Friendship’

माधुरी आणि करिश्मा यांचा दिल तो पागल है मधला Envy डान्स तर लक्षात असेलच आपल्या. इन्स्ट्रुमेंटल बीट्सवर दोन्ही अभिनेत्रींनी ज्या धमाल डान्सिंग मूव्हज दाखवल्या होत्या त्या पाहून तुमचे पायही थिरकायला लागले असतील.

शाहरुख खान सोबतच्या 'दिल तो पागल है' सिनेमात माधुरी दिक्षित आणि करिश्मा कपूर यांना खूप पसंत केलं गेलं होतं. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या या सिनेमाची जोरदार प्रशंसा झाली होती.

आता माधुरी ५६ ची आणि करिश्मा ४८ वर्षाची झाली आहे,पण दोघींचं सौंदर्य पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणं कठीण होत आहे.

माधुरी दिक्षित डान्सिंग रिअॅलिटी शोज आणि अभिनयाच्या जगात आजही सक्रिय आहे. काही दिवस आधीच माधुरीची 'द फेम गेम' सीरिज भेटीस आली होती.

तर तिकडे करिश्मा देखील काही ना काही कारणानं चर्चेत येत असते. करिश्माला नुकतंच आपण ओटीटीवरील 'ब्राऊन' सीरिज मध्ये पाहिलं असेल. या सीरिजमध्ये तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली होती.