माधुरीच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा टीझर लाँन्च

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

चित्रपटात रेणुका शहाणे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. तब्बल 23 वर्षांनी माधुरी दिक्षित आणि रेणुका शहाणे पडद्यावर एकत्र दिसतील. पण टीझरमध्ये रेणुका यांची झलक नाही.

अभिनेत्री माधुरी दिक्षित नेने हिच्या बहुचर्चित पहिलावहिल्या मराठी चित्रपटाचे टीझर नुकताच लाँन्च झाले आहे. मकरसंक्रातीला चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. चित्रपटाचा टीझर माधुरीने आपल्या इंस्टग्राम अकाउंटवरुन शेअर केला. 'बकेट लिस्ट...माझी, तुमची...आपल्या सगळ्यांची' अशी चित्रपटाची टॅगलाईन आहे. 

madhuri dixit

सामान्य हाउसवाईफ आपल्या आयुष्यातला वेगळेपणा आणि आपल्या ईच्छा पुर्ण करण्याचा मार्ग कसा शोधते याविषयी चित्रपटाचे कथानक असेल. हे या टीझर मधून सहज कळते. मधुरा साने असे माधुरीच्या भुमिकेचे नाव आहे. 

madhuri dixit

चित्रपटात रेणुका शहाणे यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. तब्बल 23 वर्षांनी माधुरी दिक्षित आणि रेणुका शहाणे पडद्यावर एकत्र दिसतील. पण टीझरमध्ये रेणुका यांची झलक नाही. सई या नावाचा उल्लेख माधुरी टीझरमध्ये करते. मधुरा साने यांच्या आयुष्यात सई आल्यानंतर त्यांचे आयुष्य कसे बदलले या अविरभावात सई या नावाचा उल्लेख माधुरीने टीझरमध्ये केला आहे. कदाचित सई ही भूमिका रेणुका शहाणे यांची असेल. हे येत्या काळात स्पष्टं होईल. 

Web Title: Madhuri Dixit Nenes First Marathi Film Bucket List Teaser Out