Madhuri Dixit: डॉ. नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर माधुरी दीक्षितला खूप अडचणींचा करावा लागला सामना खुलासा करत म्हणली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

madhuri dixit

Madhuri Dixit: डॉ. नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर माधुरी दीक्षितला खूप अडचणींचा करावा लागला सामना खुलासा करत म्हणली...

बॉलीवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित हिचे डॉक्टर श्रीराम नेनेशी लग्न झाले तेव्हा तिने लाखो ह्रदये तोडून आपले हृदय डॉक्टरांना दिले. पण माधुरी दीक्षितचे वैवाहिक जीवन वाटते तितके आनंदी नाही. नुकतेच माधुरी दीक्षितने पती श्रीराम नेने यांच्या यूट्यूब चॅनलवर तिच्या वैवाहिक जीवनाविषयी सांगितले आहे.

एक डॉक्टरची पत्नी असल्यामुळे हा काळ तिच्यासाठी किती कठीण गेला आहे हे सांगितले आहे. माधुरी दीक्षित म्हणाली - वेळ मिळत नसल्यामुळे खूप अवघड होते, कधी मॉर्निंग शेड्यूल, कधी नाइट शेड्यूल... तर कधी दिवसभर फोनवर व्यस्त असायचे.

माधुरी दीक्षित आपली व्यथा मांडताना पुढे म्हणाली - हे खरंच खूप अवघड होतं कारण ती वेळ होती जेव्हा तू तिथे नव्हतास आणि मी नेहमी मुलांसोबत असायचे, त्यांना शाळेत घेऊन जावं लागायचं. या सगळ्या गोष्टी आणि हो टायमिंग हा सुद्धा खूप मोठा मुद्दा होता.

जेव्हा जेव्हा आपल्या घरात काही स्पेशल असायचे तेव्हा तू आमच्या सोबत नव्हतास, कारण त्या काळात तू दवाखान्यात दुसर्‍याला मदत करत होतास. जेव्हा मी आजारी होते, तेव्हा तू दुसऱ्याची काळजी घेत होतास. या सर्व गोष्टी खूप कठीण होत्या.

आपले बोलणे पूर्ण करून माधुरी दीक्षित पुढे म्हणाली, पण या सर्व गोष्टी असूनही मला तुझा सदैव अभिमान वाटतो, जसे तू नेहमीच रूग्णांसाठी उभा राहायचा , त्यांच्या आयुष्यासाठी लढायचा, या गोष्टींनी माझे मन जिंकले. तुम्ही खूप छान व्यक्ती आहात. लग्नात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही समोरच्या व्यक्तीला समजून घेणे... शेवटी त्यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याला एका छान प्रवासाचा टॅग दिला.

त्यांनी सांगितले की आम्ही दोघांनीही वैवाहिक जीवनात एकमेकांना साथ दिली आहे. मुलांसाठीही नेहमीच एकत्र उभे राहिलो. मी सहमत आहे की काही वेळा खूप कठीण होते, परंतु आपल्याला माहित आहे की आपण आयुष्यात जे काही करतो ते चांगल्यासाठीच असते.