माधुरी दीक्षितचा हा फोटो होतोय व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी यांच्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाल्याने तिने डॉ. नेने यांच्यासोबतचा रोमॅंटीक फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्‍स कमेंटचा वर्षाव सुरू केला आहे.

मुंबई ः बॉलीवूड अभिनेत्री आणि "धक धक गर्ल' म्हणून ओळख असलेली माधुरी दीक्षित आपला हटके अंदाज आणि सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या चित्रपटांपासून दूर असूनदेखील माधुरीचा बॉलीवूडमध्ये दबदबा पाहायला मिळतो. डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी यांच्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाल्याने तिने डॉ. नेने यांच्यासोबतचा रोमॅंटीक फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्‍स कमेंटचा वर्षाव सुरू केला आहे.

माधुरी आणि डॉ. श्रीराम काही दिवसांपासून सेशेल्स येथे सुट्यांचा आनंद लुटत आहेत. दोघे जण आपल्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन करीत आहेत. माधुरी आणि डॉ. श्रीराम यांचा किसिंग फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो माधुरीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच या फोटोला दिलेले कॅप्शन तिने "सोलमेट फॉरएवर' असे ठेवले आहे. त्यासोबतच तिने दोघांचा आणखी एक प्रेमळ फोटो शेअर केला आहे. यात दोघांमधील प्रेम नेटीझन्सचा चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोला शेअर करत अनेक अभिनेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. श्रीराम आणि माधुरी यांचे लग्न 18 ऑक्‍टोबर 1999 साली झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhuri dixit viral intagram photo