माधुरी शिकवणार डान्स 

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

उत्तम डान्स सेन्स असलेली एके काळची सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित आता नृत्याचे धडे देणार आहे. तिच्याकडून डान्स शिकण्याची संधी तिच्या फॅन्सना मिळणार आहे. "डान्स माझी पॅशन आहे. तिसऱ्या वर्षापासून मी डान्स शिकतेय; पण आता प्रथमच मी डान्स शिकवणार आहे,' असे सांगून तिने आपल्या नव्या इनिंगची माहिती नुकतीच दिलीय.

"व्हिडीओकॉन डी 2 एच' कंपनी "डान्स विथ माधुरी'शी सहयोग करून "डी 2 एच नचले' नावाने नवी वाहिनी सुरू करतेय. त्या वाहिनीवर माधुरी तिचे प्रख्यात गुरू आणि नृत्य दिग्दर्शकांसह डान्स शिकवणार आहेत. माधुरी म्हणते, "सरोज खान, रेमो डिसूझा आणि बिरजू महाराज यांना मी आदर्श मानते. डान्स शिकण्यासाठी वयाचं बंधन नाही. कोणत्याही वयात तो शिकता येतो; परंतु त्याची आवड असणं महत्त्वाचं. डान्समध्ये प्रचंड मेहनत आहे.' माधुरी लावणीही शिकवणार आहे. तिच्या दृष्टीने शास्त्रीय नृत्य फार महत्त्वाचे आहे. नृत्याचा मूळ पाया मजबूत असणे आवश्‍यक आहे. तो जर डळमळीत असेल तर तुम्ही नृत्य करूच शकत नाही, असे ती ठामपणे सांगते.

"डी 2 एच नचले' वाहिनीवर माधुरीसोबत पं. बिरजू महाराज, रेमो डिसूझा, टेरेन्स लुईस, सरोज खान आदींसह अनेक नृत्य दिग्दर्शक डान्स शिकवणार आहेत. कथ्थक अन्‌ भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्यासह जाझ, कन्टेम्पररी, हिप हॉप, साल्सा, बचाटा आदी नृत्यप्रकारही शिकवण्यात येणार आहेत. हिंदी आणि इंग्लिश भाषेतील डान्स शोचे मुख्य आकर्षण असेल.  
 
Web Title: Madhuri will teach dance