महाराष्ट्र सरकारचा राजकपुर जीवनगौरव पुरस्कार अभिनेते धर्मेंद्र यांना जाहीर

रविवार, 15 एप्रिल 2018

मोरुची मावशी, दामोदर पंथ या नाटकांचे मंच गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा राजकपुर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाचे चित्रपट पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र शासन चित्रपट पुरस्कार सोहळा येत्या 30 एप्रिलला आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या पुरस्काराची घोषणा सांस्कृतिक राज्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्कारांची घोषणा केली. 

मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत या नाटकांचे मंच गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राजकपुर विशेष योगदान पुरस्कार दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना तर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री आणि दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Maharashtra governments film awards have been announced