Maharashtra Shaheer: प्रचंड चर्चा असलेल्या 'महाराष्ट्र शाहीर'ने बॉक्स ऑफिसवर कमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Shaheer, Maharashtra Shaheer news, Maharashtra Shaheer songs, Maharashtra Shaheer review

Maharashtra Shaheer: प्रचंड चर्चा असलेल्या 'महाराष्ट्र शाहीर'ने बॉक्स ऑफिसवर कमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

Maharashtra Shahee Box Office Collection News: मराठी मनोरंजन विश्वात सध्या चर्चा आहे ती म्हणजे महाराष्ट्र शाहीर सिनेमाची. सिनेमात शाहीर साबळेंच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी झळकत आहे.

अंकुशला आपण आजवर सिनेमा,नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये वेगवेगळ्या रुपात भेटलोय. गेल्या अनेक वर्षांमध्ये अंकुश चौधरीने महाराष्ट्र शाहीर हा केलेला पहिला बायोपिक आहे.

अंकुशची प्रमुख भूमिका असलेला आणि केदार शिंदेंनी दिग्दर्शित केलेला महाराष्ट्र शाहीर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर किती गल्ला जमवला हे पाहूया.

(maharashtra shaheer box office collection kedar shinde ankush chaudhari)

महाराष्ट्र शाहीर २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. सिनेमाची गेली अनेक वर्ष चर्चा होती.

अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत तर केदार शिंदेनी गेली ४ - ५ वर्ष या सिनेमासाठी घेतलेली विशेष मेहनत,

अजय - अतुल यांचं संगीत - गाणी अशा अनेक गोष्टींमुळे महाराष्ट्र शाहीर सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. महाराष्ट्र शाहीर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं आहे का? जाणून घेऊया

बोलक्यारेषाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहिल्याच दिवशी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी महाराष्ट्र शाहीर पाहण्यासाठी गर्दी केली. प्रेक्षकांची उत्सुकता सिनेमागृहात सुद्धा दिसली.

पहिल्याच दिवशी तिकीटबारीवर चांगली कमाई करत महाराष्ट्र शाहीरने ३० लाखांचा गल्ला केलाय. महाराष्ट्र शाहीर सिनेमाला लागून विकेंड आलाय.

शनिवार - रविवार आणि सोमवारी आलेली १ मे महाराष्ट्र दिनाची सुट्टी, अशा गोष्टींमुळे महाराष्ट्र शाहीर लवकरच कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र्र शाहीर सिनेमाचं बजेट एकूण ७ कोटींच्या घरात आहे. ७ कोटींचं बजेट असलेला महाराष्ट्र्र शाहीर सिनेमा १० कोटींपर्यंत गल्ला जमवेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

त्यामुळे गेले महिनाभर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा असलेला महाराष्ट्र शाहीर सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर सिनेमा नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.

महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर, ट्रेलर आणि गाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. अंकुश चौधरी शाहीर साबळेंची भूमिका साकारत आहे. महाराष्ट्र शाहीर सिनेमा २८ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय.