Maharashtra Shaheer: मराठीचा नाद खुळा! 'गाऊ नको किसना'ची क्रेझ थेट अमेरिकेत, रस्त्यावर मुलीचा डान्स व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Shaheer, Maharashtra Shaheer news, gau nako kisna, baharla ha madhumas, gau nako kisna, ankush chaudhari, kedar shinde, ashvini mahangade, Maharashtra Shaheer songs

Maharashtra Shaheer: मराठीचा नाद खुळा! 'गाऊ नको किसना'ची क्रेझ थेट अमेरिकेत, रस्त्यावर मुलीचा डान्स व्हायरल

Maharashtra Shaheer Gau Nako Kisna News: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाची सध्या सगळीकडे क्रेझ आहे. महाराष्ट्र शाहीर सिनेमाची आतापर्यंत दोन गाणी व्हायरल झालीय.

बहरला हा मधुमास आणि गाऊ नको किसना ही दोन्ही गाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

महाराष्ट्रातील तमाम जनतेने या गाण्यावर रील व्हिडिओ बनवून ही दोन्ही गाणी सोशल मीडियावर लोकप्रिय केली. आता या गाण्यांची क्रेझ थेट अमेरिकेत गेलीय.

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

(maharashtra shaheer song 'Gau Nako Kisna' craze live in America, girl's street dance at times square new york)

नुकतंच केदार शिंदेंनी एक व्हिडिओ शेयर केलाय. या व्हिडिओत एक मुलगी अमेरिकेतील टाइम्स स्क्वेवर ठिकाणी गाऊ नको किसना गाण्यावर डान्स करतेय. या मुलीचं नाव कृतिका नारकर.

कृतिकाने न्यू यॉर्क येथील टाइम्स स्क्वेवर येथे गाऊ नको किसना गाण्यावर सुंदर डान्स केलाय. हा डान्स सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला असून महाराष्ट्र शाहीर आणि गाऊ नको किसना गाण्याची क्रेझ किती सर्वदूर पोहोचली आहे, हेच दिसून येतं.

काहीच दिवसांपूर्वी गाऊ नको किसना हे नवीन गाणं यु ट्यूबवर रिलीज झालंय. या गाण्यात व्हायरल बॉय जयेश खरेचा आवाज ऐकायला मिळतोय. जयेश खरे हा तोच मुलगा आहे जो शाळेत चंद्रा गाणं गाऊन लोकप्रिय झाला होता.

त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता. शेवटी संगीतकार अजय - अतुल यांनी त्याचा आवाज हेरला आणि जयेशला महाराष्ट्र शाहीर मध्ये गाण्याची संधी मिळाली.

महाराष्ट्र शाहीर मधील गाऊ नको किसना या गाण्याचा व्हिडिओ सुद्धा लोकप्रिय झालाय. यात शाहीर साबळे म्हणजेच छोटा किसना आईपासून लपत गाणं गातोय.

जेव्हा त्याची आई समोर येते तेव्हा गावातले गावकरी त्याला 'गाऊ नको किसना' असं सांगत असतात.

शाहिरांचं निरागस बालपण या गाण्यातून उलगडलं आहे. 'आईचा धाक आणि गाण्याची हाक, भजन-कीर्तन, भारुडं, ओव्यांमध्ये रमणाऱ्या लहानग्या किसनाचं' हे गाणं अत्यंत श्रवणीय आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत झळकणार आहे. २८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.