Prasad Khandekar Birthday: 'ती' घटना घडली नसती तर आज प्रसाद खांडेकर 'हास्यजत्रा' नाही तर IPL गाजवत असता.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtrachi hasya jatra fem prasad khandekar want to become a cricketer but after major accident he choose another career

Prasad Khandekar Birthday: 'ती' घटना घडली नसती तर आज प्रसाद खांडेकर 'हास्यजत्रा' नाही तर IPL गाजवत असता..

Prasad Khandekar:  महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद आणि नम्रता संभेराव (Namrata Sambherao) या दोघांची जोडी महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मध्ये हिट आहे.

प्रसादची केवळ अभिनय करत नाही तर तो उत्तम लेखक आहे. त्यांचे 'कुर्रर्रर' हे विनोदी नाटक सध्या जोरदार सुरू आहे. या शिवाय प्रसाद 'एकदा येऊन तर बघा…रिटर्न जाणारच नाही’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.

प्रसाद साठी इथपर्यंतचा प्रवास फार अवघड होता. त्याने खूप स्ट्रगल केला आहे. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्याला अभिनयात काहीच रस नव्हता, त्याला खरं तर क्रिकेटर व्हायचं होतं. पण एक 'ती' घटना घडली नसली तर तो 'हास्यजत्रा' नाही तर 'IPL' गाजवत असता..

आज प्रयासचा वाढदिवस, त्या निमित्ताने जाणून घेऊया ही खास गोष्ट..

(maharashtrachi hasya jatra fem prasad khandekar want to become a cricketer but after major accident he choose another career)

प्रसाद खांडेकर म्हणजे विनोदाची डबल डेकर अशी त्याची ख्याती आहे. उत्तम अभिनय, तितकीच सशक्त लेखनी आणि विनोदाचा सकस दर्जा यामुळे प्रसादने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

'हास्यजत्रा' सुरू झाली की, प्रेक्षक प्रसादची आतुरतेने वाट पाहत असतात. मग तो पोलिसाच्या भूमिकेत असो, मुलाला बडवणाऱ्या बाबाच्या भूमिकेत असो किंवा अगदी सर्वांना आवडल्या आवली लवली कोहली च्या भूमिकेत असो.. त्याच्या प्रत्येक भूमिकेतून त्याने आपल्याला भरभरून हसवलं आहे. त्याने साकारलेलं गतिशील वेगेपूरकर हे पात्र तर प्रेक्षकांना भंडावून सोडतं.

प्रसाद आज मनोरंजन क्षेत्रात जरी आज चमकत असला तरी तो उत्तम क्रिकेटर आहे. त्याच्या आयुष्यात एक घटना घडली म्हणून तो मागे आला नाहीतर प्रसाद आज क्रिकेटर झाला असता. ती घटना अशी की..

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या घटनेबाबत एका मुलाखतीत तो म्हणाला होता, 'खरं तर मी क्रिकेटपटू होतो. मुंबईमधून अंडर १४साठी माझी निवड झाली होती. इयत्ता दहावीनंतर माझा एक मोठा अपघात झाला. त्यानंतर सगळंच थांबलं. जवळपास तीन महिने केईएम रुग्णालयामध्ये माझ्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर माझ्या आयुष्याला बरंच वळण मिळालं'

'त्यानंतर मी माझ्या वडिलांबरोबर भरत जाधवचं 'श्रीमंत दामोदर पंत'हे नाटक बघायला गेलो होतो. त्यावेळी मला असं वाटलं की हे क्रिकेट सारखंच आहे. इथे तुम्ही करत असलेल्या कामाची तुम्हाला समोरासमोर पोचपावती मिळते.'

'मी जिथे शिकत होतो, तिथे नाटकाचे फारसे वातावरण नव्हते, मग आम्ही काही मुलांनी मिळून एक ग्रुप केला आणि मग एकांकिका, नाटक हा प्रवास सुरू झाला. सुरवातीला क्रिकेट सोडावं लागलं याचं दुःख झालं होतं पण नाटकाने ते भरून काढलं' अशा भावना प्रसादने व्यक्त केल्या होत्या.