ओळखा पाहू मी कोण? फिल्टरपाड्याच्या बच्चनचा हिरव्या-पिवळ्या रंगातला फोटो, नेटकरी सैराट | Gaurav More holi Photo | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtrachi hasyajatra fame gaurav more photo during holi 2023 celebration goes viral users funny comments

Holi 2023 : ओळखा पाहू मी कोण? फिल्टरपाड्याच्या बच्चनचा हिरव्या-पिवळ्या रंगातला फोटो, नेटकरी सैराट

आज राज्यात धूळवडीची धूम पाहायला मिळते आहे. तसेच सोशल मीडियावर महाराष्ट्रासह देशभरात लोक रंगात न्हाऊन गेलेले पाहायला मिळत आहेत . यादरम्यान महाराष्ट्राचा लाडका विनोदवीर गौरव मोरेचा एक फोटो व्हायरल होतो आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम या कार्यक्रमामुळे गौरव मोरे हे नाव घराघरांत पोहचलं आहे. फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जाणार गौरव आता मराठी चित्रपटांमध्येही गौरव काम करताना दिसत आहे. दरम्यान रंग खेळल्यानंतरचा एक फोटो गौरवने शेअर केला आहे.

गौरवच्या या फोटोवर लोक मजेशीर कंमेंट्स करत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने गौरवला औळख मिळवून दिलीय. या कार्यक्रमात तो बऱ्याचदा स्वतःच्या दिसण्यावर देखील विनोद करताना दिसतो. ज्याच्या माध्यमातून तो लोकांना अगदी पोटभर हसवतो.

त्याने हिरव्या-पिवळ्या रंगाच बुडलेला स्वतःचा फोटो ट्वीट केला आहे ज्यावर लोक मजेशीर कमेंट्स करत आहेत. गौरवच्या या फोटोला प्रथम कांबळे या वापरकर्त्यांने "जास्त झालं भावा" अशी कमेंट केलीय. तर एका युजरने आपली रंगपंचमी १२ तारखेला असते एवढी हौस आहे तर बिहारमध्ये जाऊन खेळ ना असा सल्ला देखील दिला आहे.

अमित कुलकर्णी या वापरकर्त्याने "कडक. एकदा tanana tana चा slow मोशन विडिओ टाका या अवस्थेत" अशी मागणी देखील गौरवकडे केली आहे. तर काही जण "गौऱ्या ला शोधा" अशा कमेंट्स देखील करत आहेत.

टॅग्स :viral