स्पायडरमध्ये महेश बाबू?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

दाक्षिणात्य स्टार महेश बाबूचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. महेश बाबूचा ‘भारत अने नेनू’ हा तेलुगु सिनेमादेखील नुकताच प्रदर्शित झाला. तेलुगु सिनेमांत एक वेगळीच छाप उमटवल्यानंतर महेश बाबू आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महेश बाबूने बॉलीवूडमधील अनेक व्यक्तींची भेट घेतली आहे. तसंच स्पायडर चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये तो झळकणार असल्याची चर्चादेखील सध्या बी-टाऊनमध्ये आहे. याआधी स्पायडरच्या हिंदी रिमेकमध्ये सलमान खान आणि हृतिक रोशनच्या नावाची चर्चा होती; पण स्पायडरच्या हिंदी रिमेकसाठी महेश बाबूची वर्णी लागली आहे. साऊथमध्ये महेश बाबु लोकप्रिय आहेच, त्याच्या अभिनयाची झलक अनेकांनी वाहिन्यांवर लागणाऱ्या त्याच्या डब सिनेमांमधून पाहिली असेलच. म्हणूनच स्पायडरमध्ये त्याची भूमिका नक्की कशी असणार याबाबत उत्सुकता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahesh babu in spider movie?