esakal | #HBDSuperstarMAHESH : महेश बाबूच्या वाढदिवशी ‘सारीलेरू निकेव्हेरु’ चित्रपटाचा टीझर लाँच
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Babu

महेश बाबूची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा काही कमी नाही. 2005 साली महेश बाबूने अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले.

#HBDSuperstarMAHESH : महेश बाबूच्या वाढदिवशी ‘सारीलेरू निकेव्हेरु’ चित्रपटाचा टीझर लाँच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय सुपरस्टार अभिनेता महेश बाबू याचा आज 45 वा वाढदिवस. हँडसम हंक आणि स्टायलिश लूकसाठी महेश बाबू टॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. त्याने अनेक बिगबजेट चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक रेकॉर्डही त्याच्या नावावर आहेत.

महेश बाबूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या आगामी ‘सारीलेरू निकेव्हेरु’ चित्रपटाचा इंट्रो टीझरही लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात महेश बाबू मेजर अजय कृष्णा नावाच्या एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. महेशने 1979 साली बालकलाकार म्हणून आपल्या कारकीर्दीस सुरवात केली. बालकलाकार म्हणून त्याने 8 चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

महेश बाबूची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या स्टोरीपेक्षा काही कमी नाही. 2005 साली महेश बाबूने अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले. एके दिवशी त्याने आई-वडिलांना सांगण्यापेक्षा आपल्या बहिणीला नम्रतासोबतच्या नात्याबद्दल सांगितले. नम्रता आपल्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे, याची भीती महेशला होती. त्यामुळे कुटुंबातील सदस्य त्यांच्या लग्नास नकार देतील याची भीती महेशला वाटत होती, पण त्याच्या बहिणीने मध्यस्थी केल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नास होकार दिला आणि 10 फेब्रुवारीला महेश आणि नम्रता जोडपे लग्नाच्या बेडीत अडकले.

अभिनेत्री नम्रता शिरोडकरने बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत 'जब प्यार किसी से होता है' चित्रपटात अभिनय केला होता. त्यानंतर महेश आणि नम्रता साऊथ फिल्मच्या सेटवरही भेटले. यानंतर या दोघांचेही प्रेम वाढू लागले. महेश आणि नम्रता यांना दोन मुले आहेत.

महेश बाबूंनी आपल्या फिल्मी कारकिर्दीत मुरारी, येवराजू, ओक्कडू, अर्जुन, बॉबी, सैनीकुडो, बिझनेसमन, श्रीमंथुडो, स्पायडर, भारत आने नेनु, महर्षी असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. महेश बाबू यांना 5 वेळा सर्वोत्कृष्ट तेलगू अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

loading image