
Anupam Kher Birthday: पहिल्याच सिनेमातून रातोरात अनुपम खेरला Mahesh Bhat ने काढून टाकलं.. मग पुढे जाऊन
Anupam Kher News: आज भारतीय मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांचा वाढदिवस आहे. अनुपम खेर गेली अनेक वर्ष कॉमेडी, गंभीर, चरित्रात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.
अनुपम खेर आज अभिनेते म्हणून यशस्वी असले तरीही पहिल्याच सिनेमात काम मिळवण्यासाठी अनुपम यांना मोठा संघर्ष करावा लागला होता. काय होता तो किस्सा जाणून घेऊया.
(Mahesh Bhatt fired Anupam Kher overnight from his first movie)
अनुपम खेर यांचा पहिला सिनेमा होता सारांश. २८ वर्षांचे अनुपम सिनेमात ६० वर्षांच्या म्हाताऱ्याची भूमिका साकारणार होते.
या सिनेमाच्या निमित्ताने अनुपम खेर बॉलिवूड मध्ये पदार्पण करणार होते. अनुपम खेर यांना सिनेमासाठी साइन करण्यात आलं होतं. राजश्री प्रॉडक्शनचे मालक ताराचंद बडजात्या सारांश ची निर्मिती करत होते.
सिनेमाचे शूटिंग काही दिवसात सुरू होणार होते. अनुपम खेर प्रचंड आनंदी आणि उत्सुक. शूटिंग उद्यावर आलं होतं पण अचानक अनुपम खेर यांना बातमी मिळाली की त्यांच्या जागी संजीव कुमार यांना चित्रपटात कास्ट केले जात आहे.
हे ऐकून अनुपम यांना मोठा धक्का बसला. त्यांनी दिग्दर्शक महेश भट्ट यांना फोन केला.
महेश भट्ट यांनी अनुपम खेर यांना सांगितले की, राजश्री प्रॉडक्शनला या भूमिकेसाठी एका प्रसिद्ध अभिनेत्याची गरज होती, त्यामुळे नवख्या अनुपमच्या जागी संजीव कुमार यांना कास्ट करण्यात आले.
पहिल्याच सिनेमातून रातोरात काढून टाकल्याने मुंबईत नव्याने आलेल्या अनुपम खेर यांनी सर्व सोडून पुन्हा गावी जाण्याचा विचार केला. सामान बांधून अनुपम मुंबईहून परत जात असताना वाटेत त्यांना महेश भट्ट यांचे घर दिसले.
जाण्याआधी मनातली खदखद महेश भट्ट यांना सांगून जावी असं अनुपम यांना वाटलं. रागावलेला अनुपम महेश भट्टच्या घरी पोहोचला.
अनुपम काहीसा चिडून त्यांना म्हणाला, 'जाण्यापूर्वी मी तुला एवढंच सांगेल कि तुम्ही एक नंबरचे खोटे व्यक्ती आहात. माझी फसवणूक झालीय. मी गेले सहा महिने माझ्या भूमिकेसाठी रिहर्सल करत होतो आणि आज अचानक मला चित्रपटातून काढून टाकले जात आहे."
अनुपम खेर यांचं बोलणं महेश भट्ट यांना दुःखी करून गेलं. महेश भट यांनी राजश्री प्रॉडक्शनला फोन केला आणि सांगितले की, जर अनुपम खेर या चित्रपटात नसतील तर ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार नाहीत.
अशा प्रकारे अनुपम खेर यांना ही भूमिका मिळाली ज्याचे खूप कौतुक झाले. सुमारे 1 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 2 कोटींचा व्यवसाय केला. आजही सारांश मधली अनुपम खेर यांची भूमिका नावाजली जाते.