महेश भट यांच्या 'सडक 2' मध्ये आलिया भट

गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

1991 साली बॉलिवूडमध्ये सुपर डुपर हिट ठरलेल्या सडक या चित्रपटाचा सीक्वल 'सडक 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट दिग्दर्शित केलेल्या सडक या चित्रपटात संजय दत्त आणि पुजा भट यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता आणि म्हणूनच या चित्रपटाचा सिक्वल काढण्याचा निर्णय महेश भट यांनी घेतला आहे.

मुंबई : 1991 साली बॉलिवूडमध्ये सुपर डुपर हिट ठरलेल्या सडक या चित्रपटाचा सीक्वल 'सडक 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट दिग्दर्शित केलेल्या सडक या चित्रपटात संजय दत्त आणि पुजा भट यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड गाजला होता आणि म्हणूनच या चित्रपटाचा सिक्वल काढण्याचा निर्णय महेश भट यांनी घेतला आहे.

'सडक 2' या चित्रपटात संजय दत्त, पूजा भट, आलिया भट आणि आदित्य रॉय कपूर ही कलाकार मंडळी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीझर महेश भट यांच्या वाढदिवसानिमीत्त प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता संजय दत्तने या चित्रपटाचा टीझर ट्विटरवर शेअर करुन महेश भट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहे. संजयनंतर आलियानेदेखील तिच्या इन्स्टाग्रामवर या टीझरचा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये 1991 सालच्या सडकमधील काही दृष्ये दाखवण्यात आली आहेत. त्यानंतर, 27 वर्षानंतर पुन्हा त्याचा सीक्वल येणार असल्याचं दाखवण्यात आलेले आहे. तसेच, आलिया भट्ट हिने इंस्टाग्रामवर हिने महेश भट्ट, संजय दत्त, पुजा भट्ट आणि अदित्य रॉय कपूर यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या चित्रपटातून आलिया आणि पूजा भट या दोघी बहिणी स्क्रिन शेअर करणार आहेत.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

❤️❤️❤️

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on  

दरम्यान, 'सडक 2' बनवणार, अशी चर्चा दीर्घकाळापासून बॉलिवूडमध्ये सुरू होती. अखेर आज महेश भट्ट यांच्या वाढदिवशी या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, 'सडक 2' अन्य कुणी नाही तर स्वत: महेश भट्ट हेच दिग्दर्शित करणार असल्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. 20 वर्षांपूर्वी महेश भट यांनी दिग्दर्शन सोडले होते, परंतु आता तब्बल तब्बल 20 वर्षानंतर ते पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात वापस येणार असल्याने त्यांचे चाहते खूश आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात ते पहिल्यांदाच आपल्या मुलीला म्हणजे आलिया भटला डायरेक्ट करणार आहेत म्हणून आलिय भटही खूश आहे. 

25 मार्च 2020 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आलियाला पहिल्यांदाच डायरेक्ट करणार असल्याने, महेश भटही उत्साहित आहेत. याशिवाय, संजय दत्तसोबत खूप दिवसानंतर काम करण्यासाठी ते उतावीळ आहेत.

दरम्यान, 1991 मध्ये सडक हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. यातील म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. यात पूजा भट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात संजय दत्त एका वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि यानंतर दलालांपासून तिला वाचवतो, असे दाखवले गेले होते. हीच कथा पुढे नेत 'सडक 2' मध्ये संजय दत्त व त्याच्या मुलीची भूमिका दाखवली जात आहे. यात पूजा भट फ्लॅशबॅकमध्ये दिसणार आहे. 'सडक 2' हा प्रेक्षकांच्या पसंतीत उतरणार की नाही याकडे साऱ्यांच लक्ष वेधलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh Bhatt returns to direction with Sadak 2 daughters Alia and Pooja to star with Sanjay Dutt