महेश भट्ट यांच्या 'जलेबी'ला मिळाली प्रदर्शनाची तारीख; पोस्टरने खेचले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

चित्रपटात अभिनेत्री रिया चक्रोबर्ती आणि वरुण मित्रा यांच्या प्रमुख भुमिका आहेत. ही एक लव्हस्टोरी आहे. वरुण या चित्रपटातून त्याचा डेब्यू करणार आहे.

चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी नुकताच एका चित्रपटाची घोषणा त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन केली आहे. चित्रपटाचं नाव आहे 'जलेबी'. महेश भट्ट आणि विशेष फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्पदिप भारद्वाज यांनी केले आहे. 12 ऑक्टोबर ला चित्रपटासाठी प्रदर्शनाची तारीख मिळाली असल्याची घोषणा महेश भट्ट यांनी केली आहे. 
 

चित्रपटात अभिनेत्री रिया चक्रोबर्ती आणि वरुण मित्रा यांच्या प्रमुख भुमिका आहेत. ही एक लव्हस्टोरी आहे. वरुण या चित्रपटातून त्याचा डेब्यू करणार आहे. चित्रपट प्रदर्शनाची तारीख सांगत असतानाच चित्रपटाचे पोस्टरही महेश भट्ट यांनी रिलीज केले आहे. चित्रपटाचे पोस्टर फार रंजक आहे. रिया ही ट्रेनच्या खिडकीमधून वरुणला किस करतानाचा फोटो पोस्टरवर आहे. 

चित्रपट निर्माते करण जोहरनेही त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन 'जलेबी'साठी शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या मार्च महिन्यात महेश भट्ट यांनी 'जलेबी'च्या कलाकारांसोबतचा फोटो सोशल मिडीयावर अपलोड केला होता.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh Bhatts Jalebi Gets A Release Date Poster Launched