Nivedita Saraf: लग्न झालंय म्हणून महेश कोठारेंनी निवेदिता सराफ यांना दिला होता नकार.. नाहीतर आज.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh kothare rejects nivedita saraf from zapatlela marathi movie because of she married with ashok saraf

Nivedita Saraf: लग्न झालंय म्हणून महेश कोठारेंनी निवेदिता सराफ यांना दिला होता नकार.. नाहीतर आज..

मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ. गेली काही वर्ष सातत्याने त्या विविध मालिकांमधून आपल्या भेटीला येत आहेत. सध्या त्या कलर्स मराठी वरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहेत.

याशिवाय नाटक, चित्रपट यातही त्या सक्रिय आहेत. पण निवेदिता सराफ हे नाव काढलं की आपल्याला आठवतो तो जुना काळ आणि निवेदिता सराफ, अशोक मामा, लक्ष्या, महेश कोठारे त्यांच्या जोडीने दिलेले हीट चित्रपट.

यांनी एकत्र जेवढे काम केले तेवढेच त्यांच्या मैत्रीचे किस्सेही बरेच आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत, महेश कोठारे आणि निवेदता सराफ यांच्यातील एक खास किस्सा..

(mahesh kothare rejects nivedita saraf from zapatlela marathi movie because of she married with ashok saraf )

मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर ठरलेला एक चित्रपट म्हणजे महेश कोठारे यांचा 'झपाटलेला'.. या चित्रपटाने अनेक विक्रम केले. हा चित्रपट आजही तितक्याच आवडीनं पाहिला जातो. याच चित्रपटाच्या दरम्यान घडलेला एक किस्सा आज पाहूया.

‘झपाटलेला’ या चित्रपटात अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, दिग्दर्शक महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर, मधु कांबीकर, किशोरी आंबिये असे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटात महेश कोठारे यांची सह अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ ती भूमिका साकारणार होत्या.

पण अचानक किशोरी आंबिये यांनी ती भूमिका केल्याने अनेक चर्चा उठल्या. महेश कोठारे आणि निवेदिता सराफ यांचे बिनसले, असेही बोलले गेले. पण तेव्हा नेमकं काय झालं होतं याबाबत महेश कोठारे त्यांनी त्यांच्या पुस्तकातून सांगितले आहे.

महेश कोठारे यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले की, 'झपाटलेला या चित्रपटातील नायिकेसाठी ज्या प्रेमळ भावनांची गरज होती, त्यासाठी मला लग्न झालेली अभिनेत्री मला नको होती. निवेदिता सराफ यांनी ही भूमिका साकारवी हे माझ्याही मनात होतं.'

'पण त्यावेळी नुकतंचअशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचे लग्न झालं होतं. त्यामुळे भूमिकेतून हवी असलेली ती भावना मिळाली नसती. म्हणून मी गौरी हे पात्र निवेदिता सराफऐवजी अभिनेत्री किशोरी आंबियेंना दिलं.' अशा शब्दात त्यांनी हा खुलासा केला आहे.