मी कुणाचा बांधील नाही.. 'बिग बॉस मराठी' बाबत महेश मांजरेकरांचं मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mahesh manjrekar said why he not hosting bigg boss marathi season 4  colors marathi

मी कुणाचा बांधील नाही.. 'बिग बॉस मराठी' बाबत महेश मांजरेकरांचं मोठं विधान

Bigg Boss marathi season 4 : मराठी मालिका विश्वात 'बिग बॉस' ही संकल्पना रुजेल का याबाबत अनेकांना शंका होती. पण काही वर्षांपूर्वी बिग बॉस मराठीत सुरु झाला आणि प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. दैनंदिन मालिकांमधील काल्पनिक कुरघोड्या पाहण्यापेक्षा एका घरात बंद असलेल्या लोकांमध्ये घडणाऱ्या खऱ्या कुरघोड्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या. बघता बघता या मालिकेचे तीन सीजन झालेही आणि आता चौथा सीजन कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. (bigg boss marathi season 4) पण या शो मध्ये रंजकता आणणारे सूत्रसंचालक महेश मांजरेकर या पर्वात असतील की दुसरं कोणी असेल याबाबत आता मोठी चर्चा सुरू आहे. अनेकांनी महेश मांजरेकर हा शो होस्ट करणार नाहीत अशी खात्रीच बाळगली आहे. पण नेमकी खरी परिस्थिती काय आहे यावर स्वतः महेश मांजरेकर यांनी भाष्य केले आहे.

बिग बॉस मराठीचे (bigg boss marathi) चौथे पर्व सप्टेंबर अखेर सुरू होणार असल्याची चर्चा आहे. पण या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार असा प्रश्न चाहत्यांना आहे. याबाबत अद्याप खुलासा झाला नसला तरी महेश मांजरेकर यंदा शो होस्ट करणार नाहीत (mahesh manjrekar) असे बोलले जात आहे. काहींनी सिद्धार्थ जाधव हा शो होस्ट करेल असेही सांगितले आहे. पण अद्याप या बाबत वाहिनीने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. मात्र एका मुलाखती दरम्यान महेश मांजरेकर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. (mahesh manjrekar said why he not hosting bigg boss marathi season 4 colors marathi )

महेश मांजरेकर म्हणाले, 'माझं तीन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट होतं. ते तीन वर्ष मी मन लावून हा शो होस्ट केला. अजूनही मला विचारलं तर मी या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करायला तयार आहे. पण मी आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनसाठी बांधील नाहीये. किंवा मला घेण्यासाठी वाहिनी ही बांधील नाहीय. अर्थात मला विचारलं तर मी पूर्ण मेहनतीने शो होस्ट करेन. पण मी नाही केलं तरी माझी नाराजी असणार नाही. मी तेवढ्याच आनंदाने तो कार्यक्रम बघेल.' महेश यांच्या या विधानानंतर मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. आता नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी वाट बघण्याशिवाय गत्यंतर नाही.

Web Title: Mahesh Manjrekar Said Why He Not Hosting Bigg Boss Marathi Season 4 Colors Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..