महेश मांजरेकरांच्या मुलाची नवी इनिंग.. सत्या मांजरेकर अभिनयासोबतच आता 'या' क्षेत्रातही आजमावणार नशीबSatya Manjreka New Business | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Manjrekar with his son Satya manjrekar

Satya Manjrekar: महेश मांजरेकरांच्या मुलाची नवी इनिंग.. सत्या मांजरेकर अभिनयासोबतच आता 'या' क्षेत्रातही आजमावणार नशीब

Satya Manjrekar: 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाच्या फर्स्ट लूक पार्टीनंतर सत्या मांजरेकर हे नाव जोरदार चर्चेत आलं. अर्थात त्याच्या अभिनयाला आणि लूकला लोकांनी चांगलीच नावं तेव्हा ठेवली होती.

मांजरेकरांनी स्वतःचा सिनेमा म्हणून मुलाला कुवत नसताना संधी दिली असं देखील बोललं गेलं. पण यावर सत्या किंवा महेश मांजरेकर दोघांनीही फार व्यक्त होणं पसंत केलं नाही. सत्याकडे वडलांसारखा अभिनयाचा गुण नसल्यानं त्याचं अभिनयात फार काही होणार नाही अशा शंका व्यक्त केल्या जात असतानाच सत्या एका नव्या क्षेत्रात नशीब आजमावतोय ही बातमी मिळाली.

हो, हे खरंय की महेश मांजरेकरांचा लेक सत्या मांजरेकर आता हॉटेल बिझनेसमध्ये उतरतोय. (Mahesh Manjrekar Son Satya Manjrekar New Buisness )

त्यानं स्वतःचं 'सुका सुखी.. द मांजरेकर्स किचन' या नावाचं हॉटेल सुरू केलं आहे. सत्यानं पोस्ट करत याविषयी माहिती दिल्यानंतर त्याच्यावर जवळच्या लोकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

सत्याच्या या हॉटेलची खासियत म्हणजे इथला खास मेन्यू असणार आहे सुकी मच्छी आणि त्याचे विविध पदार्थ. तसं पाहिलं तर मांजरेकरांच्या घराविषयी, दुसऱ्यांना पोटभर खाऊ घालणाऱ्या त्यांच्या अगत्याविषयी, आणि त्यांच्या खवय्येगिरीविषयी आपण अनेक कलाकारांकडून ऐकलंच असेल. त्यामुळे अर्थातच सत्याच्या या हॉटेलमध्ये चविष्ट पदार्थ खायला मिळतील अशी आशा सध्या सगळेच करत आहेत.

सत्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमात मावळा दत्ताजी पागेच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक लोकांना खटकला होता पण आता सिनेमा पाहिल्यावर त्यातील सत्याची भूमिका लोकांना किती आवडतेय हे लवकरच कळेल.