महेश मांजरेकर यांची कन्या करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

अश्वमी मांजरेकर पण सलमान खानच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावणार असल्याचे कळते. 

अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांची कन्या अश्वमी मांजरेकर लवकरच बॉलिवूडमधून पदार्पण करण्याची चिन्हे आहेत. सिनेविश्वात कलाकारांचा वारसा चालविण्यासाठी त्यांची मुलं नेहमीच पुढे असतात. अश्वमी सुध्दा यापैकीच एक ठरु शकते. 

Mahesh Manjarekar

संपूर्ण मांजरेकर कुटुंबिय कलाविश्वात सक्रिय आहे. आता अश्वमी पण सलमान खानच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावणार असल्याचे कळते. ‘पिंकव्हिला’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सलमान खानचा आगामी सिनेमा 'दबंग 3' मध्ये अश्वमी पदार्पण करणार आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे. मे महिन्याच्या अखेरीस 'दबंग 3'च्या चित्रीकरणास सुरवात होईल. 'दबंग'च्या या सिरीजमधील हा तिसरा भाग आहे. ज्यात टेलिक्वीन मौनी रॉय देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अश्वमी आणि मौनीसाठी हा सिनेमा करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh Manjrekars Daughter To Make Her Bollywood Debut