माही गिल म्हणते; माझं लग्न झालं नसलं तरीही...

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जुलै 2019

मुलाखतीत माहीने सांगितलं की, तिला तीन वर्षांची मुलगी आहे. तिचं नाव व्हेरोनिका आहे. येत्या ऑगस्टमध्ये ती तीन वर्षांची होईल.

'देव डी', 'साहेब बीवी और गँगस्टर'मुळे चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणार अभिनेत्री माही गिल हिने नुकताच एक धक्कादायक पण गोड खुलासा केला आहे. माही सर्व चित्रपटात बॅचलर दिसत असली तरी तसं नाहीये बरं का... माही चक्क तीन वर्षांच्या मुलीची आई आहे. 

 mahie gill

नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत माहीने सांगितलं की, तिला तीन वर्षांची मुलगी आहे. तिचं नाव व्हेरोनिका आहे. येत्या ऑगस्टमध्ये ती तीन वर्षांची होईल. 'माझं लग्न झालं नसलं, तरी मी गर्वाने सांगते की मला तीन वर्षांची मुलगी आहे,' अशी भावना माहीने व्यक्त केली. माहीने केलेल्या या खुलाशाची मीडियामध्ये जोरदार चर्चा झाली आहे आणि यामुळे ती गुगल ट्रेंडमध्ये सुद्धा आली आहे.   

लग्नाबाबत विचारले असता तिने सांगितले की, 'लग्नाची काय गरज आहे? हे सगळं विचारांवर अवलंबून असतं. लग्नाशिवायही कुटूंब व मुले होऊ शकतात, यात काहीच चुकीचे नाही. मी मला हवे तेव्हा लग्न करेन, माझी मुलगी ऑगस्टमध्ये तीन वर्षांची होईल.' यापूर्वी माहीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळले होते. तसेच तिने आपल्या मुलीलाही माध्यमांपासून दूर ठेवले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahie Gill declares that she have 3 years old girl