बिगबॉस 13 फेम माहिरा शर्माची पकडली गेली चोरी..माफी माग नाहीतर..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

बिग बॉस 13 ची स्पर्धक माहिरा शर्माला बिगबॉस या शोमुळे खुप लोकप्रियता मिळाली..मात्र शो मधून बाहेर आल्यावर माहिरा एका मोठ्या अडचणीत सापडली..काही दिवसांपूर्वी तिने सोशल अकाऊंट वरुन एक फोटो शेअर करत तिला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचं सांगितलं..हा पुरस्कार तिला बिग बॉस शोची सर्वात फॅशनेबल स्पर्धक म्हणून दिला गेला..मात्र आता हे प्रशस्तीपत्रक खोट असल्याचं म्हटलं जातंय..

बिग बॉस 13 ची स्पर्धक माहिरा शर्माला बिगबॉस या शोमुळे खुप लोकप्रियता मिळाली..मात्र शो मधून बाहेर आल्यावर माहिरा एका मोठ्या अडचणीत सापडली..काही दिवसांपूर्वी तिने सोशल अकाऊंट वरुन एक फोटो शेअर करत तिला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचं सांगितलं..हा पुरस्कार तिला बिग बॉस शोची सर्वात फॅशनेबल स्पर्धक म्हणून दिला गेला..मात्र आता हे प्रशस्तीपत्रक खोट असल्याचं म्हटलं जातंय..

हे ही वाचा : ऑनलाईन लॉटरीवर पोलिसांचा छापा

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल पुरस्कार सोहळा 2020 नुकताच मुंबईत पार पडला..यामध्ये सिनेसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली होती..बिग बॉस 13ची स्पर्धक माहिरा शर्माला देखील DPIFF मध्ये पुरस्कार मिळाल्याच्या चर्चा रंगल्या.बिग बॉसची सर्वात फॅशनेबल स्पर्धक नावाखाली तिला हा पुरस्कार मिळाल्याचा दावा माहिराने केला होता..

Image result for mahira sharma

माहिराच्या या दाव्यावर दादासाहेब फाळके टीमने आक्षेप घेत हे खोट असल्याचं म्हटलंय..याप्रकारणापासून माहिरा चर्चेत आहे..माहिरा शर्मा सांगते की, 'दादासाहेब फाळके टिमने रविवारी एक स्टेटमेंट प्रसिद्ध केल होतं, पण मी माहिरा तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्यावर करण्यात आलेले सगळे आरोप हे खोटे आहेत..'

Image result for mahira sharma

माहिराच्या या मतावर दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल (DPIFF) च्या ऑफिशियल टिमचं असं म्हणणं आहे की टीमच्या सदस्यापैकी कोणीही माहिराला हे सर्टिफिकेट दिलेलं नाही..माहिराच्या या चुकिसाठी DPIFF च्या टीमने एक सूचनापत्र जारी केलं आहे.माहीराने दोन दिवसांमध्ये जाहीर माफी मागावी अशी मागणी या टीमकडून करण्यात आलीये.असं न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही माहिराला देण्यात आलाय.

 

यावर माहिरानेही आता उत्तर देत तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत स्पष्टीकरण देिलंय..यात तिने म्हटलंय, 'दादासाहेब फाळके यांच्या टीममधील प्रमल मेहतांतर्फे मला एक ईमेल आला होता. यामेलनुसार मला बिग बॉसची सर्वात फॅशनेबल स्पर्धक हा पुरस्कार देण्याविषयीची माहिती दिली होती.त्यानंतर माझ्या मॅनेजरने हा पुरस्कार स्विकारला.त्यावेळी मी माध्यमांना माझी प्रतिक्रिया देखील दिली होती.यानंतर मी माझ्या इंन्स्टाग्राम अकाऊंट स्टोरी मध्ये माझे हे फोटो शेअर केले होते.त्यामुळे माझ्यावर केलेले सगळे आरोप हे खोटे असल्याचं माहिरा सांगतेय.' 

mahira sharma official statement on fake dadasaheb phalke award


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahira sharma official statement on fake dadasaheb phalke award