
काही दिवसांपूर्वीच मुंबईत 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेने चित्रीकरणाचा श्रीगणेशा केल्यानंतर आता 'माझा होशील ना' या मालिकेने देखील चित्रीकरणाला सुरुवात केली आहे.
मुंबई- लॉकडाऊनमुळे मनोरंजन क्षेत्रातील चित्रीकरणालाही ब्रेक लागला होता मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मालिकांच्या चित्रीकरणाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईत 'स्वराज्यजननी जीजामाता' मालिकेने चित्रीकरणाचा श्रीगणेशा केल्यानंतर आता 'माझा होशील ना' या मालिकेने देखील चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. कमी वेळातंच लोकप्रिय झालेल्या झी मराठीवरील 'माझा होशील ना' या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला. मात्र लॉकडाऊनमुळे चित्रीकरण ठप्प झालं आणि प्रेक्षकांना नवीन एपिसोड पाहायला मिळाले नाहीत.
हे ही वाचा: स्वरा भास्करची 'रसभरी' पाहून चाहते घायाळ, काळी वेळातंच मिळाले इतके व्ह्युज
काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील कलाकार पुण्याहून मुंबईला आले होते. जवळपास तीन महिन्यांच्या मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा शुटिंगला सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांसोबतंच कलाकार देखील चित्रीकरणासाठी तितकेच उत्सुक आहेत. सेटवर मालिकेची टीम पुन्हा एकदा काम सुरु झाल्याने उत्साही आहे.
सेटवर नियमांचं पालन करुन चित्रीकरण करण्यात येत आहे. वापरात येणा-या गोष्टी सॅनिटाईज करणे, प्रत्येकाने मास्क वापरणे, गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग पाळून काम करणे हातात ग्लोव्हज वापरणे असे नियम सेटवर पाळले जात आहेत.
याविषयी सांगताना अभिनेत्री गौतमी देशपांडे म्हणते, 'मुंबईत आल्यानंतर मी जवळपास १५ दिवस क्वारंटाईन होते. या वेळेचा सदुपयोग करत मी माझ्या भूमिकेच्या अभ्यासावर भर दिला. येत्या काळाच मालिकेत काय बदल होतील किंवा शूटींगसाठी स्वतःला तयार करण्यासाठी माझी घरच्याघरी तालीम सुरु होती. कोरोनामुळे पुढचे अजुन काही दिवस न घाबरता नियम पाळून काम करावं लागेल. मी याचा सकारात्मकतेने विचार करायचं ठरवलं आहे. त्यामुळे खूप दिवसांच्या ब्रेकने काम करण्याचा एक वेगळाच उत्साह जाणवतोय. आम्ही आमच्या परिने सगळी काळजी घेत आहोत. निर्माते-दिग्दर्शकही त्यांच्या परिने घेतील. आम्ही सर्व नियमांचं पालन करत पूर्वीसारखीच मजा मस्तीकरत शूटींग करणार आहोत. मात्र मीही स्वतःची योग्य ती काळजी घेऊन सरकारी नियमांचं पालन करणार आहे'
majha hoshil na marathi serial began shooting