'या' कारणामुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

majhi tujhi reshimgath serial off air soon because new serial baya daar ughad is arrival

'या' कारणामुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

'झी' मराठी वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath ) ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेच्या माध्यमातून वेगळी प्रेमकथा हाताळण्यात आली. लग्न झालेल्या आणि पदरी एक मुलगी असलेल्या नेहाची ही कथा आहे. नंतर ती एका उद्योगपतीच्या प्रेमात पडते, तो तिला स्वीकारतो आणि त्यांच्या सुखी सांसारला सुरुवात होते, अशा धाटणीचे हे कथानक आहे. ही मालिका चांगलीच चर्चेत असून यश आणि नेहा आणि परी ही तीनही पात्रे चाहत्यांच्या अत्यंत जवळची आहेत. शिवाय यश आणि नेहा म्हणजेच श्रेयस तळपदे (shreyas talpade) आणि प्रार्थना बेहेरेचा (prarthana behere) चाहतावर्ग मोठा आहे. आता ही मालिका बंड होणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने चाहते नाराज झाले आहेत.

(majhi tujhi reshimgath serial off air soon because new serial baya daar ughad is arrival)

गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत प्रचंड ट्विस्ट येत आहेत. नेहाचा पहिला पती अविनाश हा परत आला आहे. त्यात परीचा ड्रायव्हर हाच नेहाचा पहिला नवरा अविनाश असल्याचं सत्य यशसमोर आल्याने आता या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. नेहाने हे सत्य लपवून ठेवल्याचा धक्का यशबरोबरच संपूर्ण चौधरी कुटुंबाला बसला आहे. एकीकडे मालिका उत्कंठावर्धक वळणावर असतानाच दुसरीकडे मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपासून झी मराठीवर एक नवी मालिका येणार अशी चर्चा होती. त्या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'दार उघड बये' असे या मालिकेचे नाव असून येत्या १९ सप्टेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. दररोज रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रक्षेपित केली जाणार आहे. त्यामुळेच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका बंद होणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सोशल मिडियावर अशा चर्चा व्हायरल होताच अनेकांनी ही मालिका बंद करु नये, अशा कमेंटही केल्या आहेत.

आता या नव्या मालिकेमुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेची वेळ बदलणार की ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे मात्र अजून अधिकृत जाहीर झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका निरोप घेणार अशीही चर्चा सुरु होती. पण त्या मालिकेतही अनामिकाच्या नवऱ्याची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे जर नवीन मालिका ८.३० वाजता प्रसारित केली जाणार असेल तर या वेळेत सध्या प्रसारित होणारी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका बंद करणार की तिची वेळ बदलणार असे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत.

Web Title: Majhi Tujhi Reshimgath Serial Off Air Soon Because New Serial Baya Daar Ughad Is Arrival

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..