राधिका आणि सौमित्रच्या लग्नाचा अल्बम पाहिला का ?

वृत्तसंस्था
Thursday, 26 December 2019

सौमित्र आणि राधिका यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांसोबतची गाठ बांधली आहे. त्यांच्या या लग्नाचा अल्बम एकदा पाहाच !

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेची प्रसिद्धी प्रचंड आहे. शनायाला गॅरी तर मिळाला पण, गॅरीच्या वागण्य़ामुळे तो सर्लच हातचं गमावून बसला आहे. आता तर राधिकालाही त्याने गमावलं आहे कारण, राधिका कायमची होणार सौमित्रची ! खडतर काळातून तिने करीअर घडवलं आणि एका कंपनीची मालकीण झाली. यामध्ये सौमित्रने तिला सच्च्या दोस्ताप्रमाणे साथ दिली. 

Image may contain: one or more people, people standing and indoor

Image may contain: 5 people, people smiling, people on stage, people standing and indoor

डिसेंबर हा एकुणच लग्नसोहळ्याचा सिझन होता. यामध्ये मराठी मालिकाही मागे नाहीत. झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्धा मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' मध्येही आता लग्नकार्य पार पडलं आहे. शनाया आणि गॅराचं नाही तर राधिका आणि सौमित्र अखेर लग्नबंधनात अडकले आहेत. 

Image may contain: one or more people

Image may contain: 1 person, smiling

(फोटो सौजन्य : हेलो)

सौमित्र आणि राधिका यांनी आयुष्यभरासाठी एकमेकांसोबतची गाठ बांधली आहे. त्यांच्या या लग्नाचा अल्बम एकदा पाहाच ! त्यांच्या लग्नात कोण कोण पाहूणे मंडळी आली होती आणि राधिका-सौमित्र यांच्या लग्नसोहळ्यातील काही खास क्षण टिपले गेले. 

Image may contain: 6 people, people smiling, people standing

Image may contain: 2 people, people smiling

(फोटो सौजन्य : हेलो)

दरम्यान राधिकाने घातलेल्या दागिन्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये सर्व गमावून बसलेला गॅरी बॅंड वाजवताना दिसला. राधिका लाल रंगाच्या साडींमध्ये सुंदर दिसते आहे. तर, सौमित्र मोती रंगाच्या शेरवानीमध्ये स्मार्ट दिसला. 

Image may contain: 2 people, people standing and beard

Image may contain: 6 people, people smiling, people standing

(फोटो सौजन्य : हेलो)

लग्न सोहळा पार पडला आहे. इथुन पुढे आता राधिका सौमित्रच्य़ा साथीने तिची कंपनी चालवणार आहे. पण, पुढे मालिकेमध्ये काय ट्विस्ट येणार आणि गॅरी पुढे काय करणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. 

Image may contain: 13 people, people smiling, people standing, wedding and indoor

Image may contain: 8 people, people smiling, people standing

गॅरी म्हणजे खऱ्या आयुष्यातील अभिजित खांडकेकर याने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो रडतोय आणि मागे 'छन से जो टुटे कोई सपना' गाणं लागलं आहे. 

Image may contain: 3 people, people smiling, people standing

Image may contain: 6 people, people smiling, people standing

(फोटो सौजन्य : हेलो)

राधिका आणि सौमित्रच्या लग्नाला प्रतिक्रिया देताना चाहत्यांनी इंटरनेटवर 'माझ्या बायकोचा नवरा' अशी मजेशीर कमेंट केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Majhya navraychi bayko marathi serial

Tags
टॉपिकस