Malaika-Arjun : लिफ्टमध्येच झाले सुरु... 'बस करा, आता लग्नाचं बघा!'

सोशल मीडियावर मलायका आणि अर्जून कपूरचे वेगवेगळ्या पोझमधील फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षावही केला आहे.
Malaika-Arjun
Malaika-Arjunesakal

Arjun Kapoor And Malaika Arora Photos : मलायका अर्जून कपूरचं प्रेमप्रकरण हे आता काही नवं राहिलेलं नाही. मलायकाचं पूर्वी अरबाज खानशी लग्न झालं होतं. त्यांच्यात कालांतरानं दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी एकमेकांपासून घटस्फोट झाला. त्यानंतर मलायका अर्जूनच्या प्रेमात पडली. गेल्या बऱ्याच वर्षांपासून ते लिव्ह इन मध्ये राहत आहेत. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत असेही मलायकानं सांगितलं आहे. पण...

सोशल मीडियावर मलायका आणि अर्जून कपूरचे वेगवेगळ्या पोझमधील फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षावही केला आहे. त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी टोकले आहे. वास्तविक मलायकाला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. तिनं इंस्टावरुन एक फोटो शेयर करायची खोटी की, त्यावर तिला मिळणारा प्रतिसाद मोठा असतो. मलायकानं तिच्या आयुष्यावर एक माहितीपटही प्रसिद्ध केला होता.

Also Read - What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

मुव्हिंग विथ मलायका असे त्या माहितीपटाचे नाव होते. त्यामध्ये मलायकानं तिच्या आतापर्यतच्या प्रवासाविषयी सांगितले आहे. नेटकऱ्यांना तिचा तो माहितीपट भलताच पाचंट वाटला. असं असलं तरी मलायका आणि अर्जून कपूरच्या नावाचं ग्लॅमर कमी होण्याचं नाव घ्यायला तयार नाही. मलायकानं काही दिवसांपूर्वी आम्ही लग्न करणार असल्याचे म्हटले होते. त्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकताही होती. मात्र अजुन त्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही.

Malaika-Arjun
Malaika Arora : लग्नाचं अजून ठरेना!

आता मलायका आणि अर्जूनचा लिफ्टमधील एक फोटो व्हायरल झाला आहे. त्या फोटोमुळे त्यांच्यावर कौतूक आणि टीका होत आहे. मलायका अर्जून लिफ्टमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. त्यावरुन ते ट्रोल झाले आहे. तुम्ही आता लवकरात लवकर लग्नाचे पाहा. असे नेटकऱ्यांनी त्यांना सुचवले आहे.

Malaika-Arjun
कुदरत ने तुझे बनाया होगा बडे...! Malaika Arora

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com