अभिनेत्री मलाइका अरोरा यांच्या गाडीचा अपघात

अभिनेत्री मलाइका अरोरा यांच्या गाडीला पनवेलनजीक अपघात झाला.
Malaika Arora
Malaika Aroraesakal
Summary

अभिनेत्री मलाइका अरोरा यांच्या गाडीला पनवेलनजीक अपघात झाला.

सहकारनगर - अभिनेत्री मलाइका अरोरा यांच्या गाडीला पनवेलनजीक अपघात झाला. अभिनेत्री मलाइका अरोरा यांच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटून राज ठाकरे यांच्या सभेला पुण्यावरून जात असणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या तीन/चार गाड्यांना अभिनेत्री मलाइका अरोरा यांच्या गाडीने धडक दिली. या घटनेत अभिनेत्री मलाइका अरोरा यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, त्यांना नवी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी मनसेचे पुणे उपशहर प्रमुख जयराज लांडगे यांनी दाखल केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र निर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी दिली.

पनवेल नजीक मलाइका अरोरा यांच्या गाडी वरील ड्रायव्हरचा ताबा सुटून मनसेच्या गाड्यांना अरोरा यांच्या गाडीने धडक दिली. या घटनेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली असून, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे , त्यांना नवी मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. जयराज लांडगे यांनी प्रसंगावधान राखून अरोरा यांना स्वतच्या गाडीतुन तातडीने नवी मुबई येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्यावरील उपचाराची सोय करुनच ते मुंबईकडे रवाना झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com