esakal | 'आमीरचाही झाला की घटस्फोट, मग मी घेतला तर'...
sakal

बोलून बातमी शोधा

'आमीरचाही झाला की घटस्फोट, मग मी घेतला तर'...

'आमीरचाही झाला की घटस्फोट, मग मी घेतला तर'...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (amir khan) याचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला. त्यानंतर बॉलीवूडमध्ये (bollywood) मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. मात्र सध्या पुन्हा त्याची चर्चा सुरु झाली आहे. त्याचे कारण म्हणजे सलमान खानचा भाऊ अरबाज खान हा त्याच्या घटस्फोटावरुन पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे. त्यामुळे त्यानं आपल्यावर टीका करणाऱ्यांनाही चांगलेच सुनावले आहे. लोकांना नेहमी भुतकाळातल्या गोष्टींमध्ये रस असतो. आपण त्याकडे जास्त लक्ष न देणं यात खरा शहाणपणा आहे. असे मला वाटते. (malaika arora arbaaz khan trolling after divorce says happened to aamir khan too yst88)

वास्तविक अरबाज खान आणि मलाईका अरोरा यांचा घटस्फोट 2017 मध्ये झाला. त्यांचे लग्न 1998 मध्ये झाले होते. आता या प्रकरणाची चर्चा होण्याचे कारण म्हणजे आमीर खानचा झालेला घटस्फोट. गेल्या काही दिवसांपूर्वी आमीरचा घटस्फोट झाला. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाला. मिस्टर परफ्केशनिस्ट अशी ज्या अभिनेत्याची ओळख होती. त्या अभिनेत्यानं घटस्फोट घेणं त्याच्या चाहत्यांसाठी धक्का होता. त्यावर आमीरनंही आपली बाजू मांडली होती.

अरबाजनं आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, होय माझा घटस्फोट झाला. हे जगजाहीर आहे. मात्र मला जो निर्णय योग्य वाटला तो मी घेतला. तुम्हीही कसेही वागलात तरी लोकं तुम्हाला नाव ठेवतातच. लोकांना बेकारच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी बराच वेळ आहे. मात्र प्रत्यक्षात तुम्ही कशाप्रकारे सहभागी होता हे जास्त महत्वाचे आहे. असे मला वाटते. यापूर्वी माझ्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये मला वाईट वेळेतून जावं लागलं आहे. त्याच्या जखमा अजूनही माझ्या मनात आहे.

हेही वाचा: अभिनेता केटीएस पदन्नियल यांचे निधन

यासगळ्या प्रकाराचे लोकांना काही देणेघेणे नसते. त्यांना चघळण्यासाठी काही विषय हवे असतात. आपण दरवेळी बरोबर असू शकत नाही. चूकतोही. याचा अर्थ त्याच्याबाबत काही निर्णयच घ्यायचे नाहीत असं नाही. त्यामुळे माझ्याबाबत कोण काय बोलतं याकडे मी फारसं लक्ष देत नाही. जी गोष्ट आमीर खानच्या बाबत झाली तिच माझ्याही बाबत घडली. तेव्हा त्याचा जास्त बाऊ करण्यात काही अर्थ नाही. असे मला वाटते. या शब्दांत अरबाजनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

loading image