मलाईकाने मागितली 15 कोटी रुपयांची पोटगी

वृत्तसंस्था
बुधवार, 28 डिसेंबर 2016

बॉलिवूडमधील 'मुन्नी' मलाईका अरोरा आणि अरबाज खान यांच्यातील दुरावा एवढा वाढलाय की ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता तर दिसत नाही, परंतु मलाईका अरबाजला सहजासहजी सोडणार नाही असं दिसतंय. मागील 18 वर्षांपासून आपले प्रेम जाहीरपणे प्रदर्शित करणाऱ्या या जोडीने आता रीतसर घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला असून ते लवकरच वेगळे होणार आहेत. मलाईकाने आता पोटगीबाबत तडजोड करण्यासाठी 10 ते 15 कोटी रुपयांची मागणी केली आहे, असे वृत्त आहे. 

मलाईकाने 15 कोटी रुपयांची मागणी केली असून, तिला किमान यातील 10 कोटी रुपये मिळाल्याशिवाय ती तडजोड करणार नाही. तसेच, त्यांचा मुलगा अरहान यालाही आपल्यासोबत राहू द्यावे अशी मलाईकाची अट आहे. अरहान हा आईसोबत राहायला तयार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

हे ब्रेकअप होऊ नये अशी अरबाज खानची इच्छा होती. त्यांनी वेगळे होण्याआधी पुन्हा एकदा नातं अजमावण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आलं नाही. दरम्यान, त्यांच्या वेगळे होण्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, मलाईकाच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांमुळे त्यांच्या नात्यात तणाव असल्याचे सांगण्यात येते. अरबाजचा भाऊ सुपरस्टार सलमान यावर काही करतो का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Malaika Arora demands 15 crore alimony from Arbaaz Khan