मलाईकाचा ट्रेंडिंग हिरवा ड्रेस, केवळ ६ हजारात तुम्ही करु शकता खरेदी

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 31 December 2020

मलाईका तिच्या या हिरव्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. या ऑफ शोल्डर मिंट ग्रीन रंगाच्या आऊटफिटमध्ये स्टनिंग दिसतेय.

मुंबई- अभिनेत्री मलाईका अरोरा किती फिटनेस फ्रिक आहे हे सगळ्यांना माहित आहे. यासोबतंच तिचा फॅशन सेन्स देखील नेहमीच चर्चेत असतो. तिचा जीम लूक असो किंवा मग एअरपोर्ट लूक. सध्या मलाईका गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. मलाईकाने सोशल मिडियावर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मिडिया सेन्सेशन बनत आहेत. या फोटोंमध्ये ती हिरव्या रंगाच्या टॉप आणि पॅन्टमध्ये दिसून येतेय. 

बिग बॉस १४: विकास गुप्ताच्या आईने सोडलं मौन, ''बाइसेक्शुएलिटीच्या आधीच तुटलं होतं नातं''  

मलाईका तिच्या या हिरव्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसत आहे. या ऑफ शोल्डर मिंट ग्रीन रंगाच्या आऊटफिटमध्ये स्टनिंग दिसतेय. हे फोटो समर वाईब्स देत आहेत. यामध्ये खास गोष्ट अशी की मलाईकाच्या चाहत्यांना जर तिच्यासारखा हा सेम टू सेम किंवा तत्सम ड्रेस हवा असेल तर तेे त्यांच्या वॉर्डरोबमध्ये ऍड करु शकता. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, मलाईकाच्या या ड्रेसची किंमत ६ हजार रुपये आहे.

मलाइका अरोड़ा ड्रेस

मलाईकाच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिच्या या ड्रेसवर तिने सोनेरी सनग्लासेस लावल्या आहेत आणि केसांचा घट्ट बन बांधला आहे. सोशल मिडियावर मलाईकाच्या या ड्रेसची जोरदार चर्चा आहे. तिच्या या ड्रेसची तुलना चाहते कोबीसोबत करत आहेत. मलाईकाचा झाडात असलेला हा फोटो लोकांना कोबीच्या शेतात कोबी फुलल्यासारखा वाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

Malaika Arora in Rs 6k off-shoulder bralette and shorts nails the summer  look in Goa - Lifestyle News

मलाईका फुल ऑन वॅकेशन मोडमध्ये दिसतेय. बॉयफ्रेंड अर्जुन कपूर देखील तिच्यासोबत आहे. मलाईका आणि अर्जुनची बॉन्डिंग लोकांना खूप आवडत आहे. या ट्रीपमध्ये मलाईकाची बहीण अमृता अरोरा, मलाईकाचा मुलगा अरहान खानदेखील आहे. करण जोहर देखील त्यांना जॉईन केलं आहे. याआधी मलाईका धर्मशाळा ट्रीपवर होती. धर्मशालामध्ये अर्जुन कपूर, करिना कपूर आणि सैफ अली खान देखील त्यांच्यासोबत होते.  

Water dripping from wet body, trolled Malaika says 'old lady' just to share  pictures in short bikini

malaika arora goa vacation 6k mint green off shoulder short dress  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malaika arora goa vacation 6k mint green off shoulder short dress